
कोपरगाव प्रतिनिधी:-
शासन धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी कोपरगाव नगरपरिषद हद्दीतील लक्ष्मीनगर मधील शासकीय व नगरपरिषदेच्या जमिनीवरील अतिक्रमण नियामानुकुल करण्यासाठीचा प्रस्ताव तयार करण्याची कार्यवाही नगरपरिषद स्तरावर सुरु आहे.
प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत सर्वांसाठी घरे २०२२ च्या धोरणानुसार उक्त नमूद सर्व्हे – न. ११३ (भाग) व ११४ (भाग) लक्ष्मीनगर भागातील अतिक्रमण नियामानुकुल करणे अपेक्षित आहे. सदर शासन निर्णय व मा. संचालक नगररचना महाराष्ट्र राज्य यांच्याकडील आदेश क्र. वि.यो. कोपरगाव / जि. अ. नगर / शिथिलता / प्र. क्र. ७५८ / टिपीव्ही- ४ / ८३९ दि. २१/०२/२०२३ या शिथिलता प्रस्तावास मान्यता मिळालेली आहे. त्यानुसार उक्त नमूद भागातील वहिवाट करीत असणाऱ्या पात्र लाभार्थी यांची पहिल्या टप्प्याची यादी सर्वसाधारण निकष पूर्ण करीत असल्यामुळे हरकती व सूचना मागविण्यासाठी नगरपरिषदेच्या सूचना फलकावर प्रसिद्ध करण्यात येते आहे.
उक्त नमूद भागाकरिता प्रथम टप्प्याच्या यादीतील लाभार्थी यांना सूचना करण्यात येत आहे. की सदर यादीतील आपले नाव, क्षेत्र, घर क्रमांक व अनुषंगिक बाबी उदाहरणार्थ आधार नंबर, जात संवर्ग इ. याबाबतची खातरजमा करावी. सदर यादीतील नमूद माहितीबाबत काही हरकत व सूचना असल्यास समाधानकारक पुराव्यासह प्रधानमंत्री आवास योजना कक्ष, कोपरगाव नगरपरिषद, कोपरगाव येथे सक्षम लेखी स्वरुपात सादर करावी.
सदर हरकती व सूचनाचा कालावधी ०१/०९/२०२३ ते १५/०९/२०२३ पर्यंत निश्चित करण्यात आला आहे. मुदतीत हरकत प्राप्त न झाल्यास यादीतील नमूद बाबी लाभार्थी यांना मान्य आहेत असे गृहीत धरुन यादी कायम केली जाईल. तसेच त्यानंतर येणाऱ्या हरकती व सूचना ग्राह्य धरल्या जाणार नाही याची नोंद घ्यावी.
