
कोपरगाव प्रतिनिधी:-
दि.६ सप्टेंबर २०२३ अहमदनगर जिल्हा काँग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभागाची आढावा बैठक प्रदेश काँग्रेसचे कार्यकुशल कार्यक्षम कार्यसम्राट प्रदेशाध्यक्ष डॉ. सिद्धार्थ हत्तीअंबिरे यांच्या उपस्थितीत हॉटेल साई छत्र शिर्डी येथे संपन्न झाली
यावेळी डॉ.सिद्धार्थ हत्तीआंबिरे यांनी आपल्या अध्यक्ष भाषणामध्ये बोलताना म्हणाले की यापुढील काळामध्ये पंचायत समिती जिल्हा परिषद नगरपालिका महानगरपालिका लोकसभा विधानसभा या सर्व निवडणूक मध्ये अनुसूचित जाती विभागातील कार्यकर्ता आणि पदाधिकाऱ्यांना योग्य ती संधी दिली जाईल कोणालाही वाऱ्यावर सोडलं जाणार नाही.
माझ्या विभागातील कार्यकर्ता प्रत्येक घरापर्यंत जाऊन काँग्रेस वाढवण्याचा अत्यंत प्रामाणिक काम करत आहे.आणि म्हणून प्रत्येक कार्यकर्त्यांच्या पाठीशी खंबीरपणे मी उभा आहे.
भाजप सरकारच्या काळामध्ये दलित आदिवासींवर वाढलेले अत्याचाराचे प्रमाण हे चिंताजनक आहे म्हणून येणाऱ्या काळामध्ये आपण कार्यकर्त्यांनी काँग्रेस सामान्य माणसापर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्नशील असणे गरजेचे आहे.
यावेळी पदाधिकाऱ्यांच्या मागणीला उत्तर देताना ते म्हणाले की शिर्डी लोकसभा ही जागा काँग्रेसलाच मिळावी यासाठी मी प्रयत्नशील आहे आणि ती मिळवण्यासाठी मी राष्ट्रीय काँग्रेस कडे मागणी करेल. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात,प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसचा विजय निश्चित महाराष्ट्र मध्ये आहे.
यावेळी जिल्हाध्यक्ष राजेंद्र वाघमारे आपल्या प्रास्ताविक भाषणामध्ये खासदार राहुल गांधी यांचे हात बळकट करण्यासाठी येणाऱ्या 2024 च्या निवडणुकीमध्ये मी शिर्डी लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसकडून उमेदवारी करण्यास इच्छुक आहे असे मतही त्यांनी यावेळी व्यक्त केले.
जिल्हा काँग्रेसचे कार्याध्यक्ष सचिन गुजर यांनीही आपल्या अभ्यासपूर्ण भाषणातून काँग्रेसच्या भूमिका स्पष्ट केल्या.
यावेळी प्रदेश काँग्रेसच्या उपाध्यक्ष तथा अहमदनगर जिल्हा काँग्रेसच्या प्रभारी प्रियंका रणपिसे यांनी ही आपले मनोगत व्यक्त करताना की शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे जागा ही बौद्धांनाच मिळावी यासाठी प्रदेशाध्यक्ष डॉ.सिद्धार्थ हत्तीआंबिरे यांच्याकडे अशी मागणीही केली.औरंगाबाद काँग्रेसचे प्रवक्ते डॉ.पवन डोंगरे, आदींनी आपले मनोगत व्यक्त केले
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रदेश काँग्रेसचे जनरल सेक्रेटरी बंटी यादव यांनी केले तर कोपरगाव तालुका काँग्रेसचे अध्यक्ष चंद्रकांत बागुल व जिल्हा काँग्रेसचे कार्याध्यक्ष संतोष गायकवाड यांनी बैठक यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केले
यावेळी जिल्हा आडवा बैठकीसाठी प्रमुख उपस्थिती, प्रदेश काँग्रेसचे सचिव नितीनराव मनोहर शिंदे, अखिल भारतीय काँग्रेस कमिटी ओबीसी विभागाच्या राष्ट्रीय समन्वयक सौ. मंगल भुजबळ,यावेळी बैठकीत राजकुमार एंगडे ( राज्य उपाध्यक्ष अनु.जाती विभाग ), डॉ.पवन डोंगरे ( राज्य उपाध्यक्ष अनु.जाती विभाग), प्रियंका रणपिसे (राज्य उपाध्यक्ष अनु.जाती विभाग), प्रदेश काँग्रेसचे जनरल सेक्रेटरी बंटी यादव, बाळासाहेब अंभीरे ( सरचिटणीस अनु.जाती विभाग),राहुल वहावळे ( सरचिटणीस अनु.जाती विभाग ), राज मेहरोल वाल्मिकी ( सरचिटणीस अनु.जाती विभाग ), योगेश थोरात ( प्रदेश सचिव अनु. जाती विभाग), अहमदनगर जिल्हा काँग्रेस अनु.जाती विभागाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र वाघमारे, औरंगाबाद जिल्हा काँग्रेस अनु.जाती विभागाचे जिल्हाध्यक्ष कृष्णा भंडारी, नाशिक जिल्हा काँग्रेस अनु.जाती विभागाचे जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर काळे, अहमदनगर शहर काँग्रेस कमिटीचे शहराध्यक्ष सचिन चौगुले, अहमदनगर अनु.जाती विभागाचे शहर जिल्हाध्यक्ष नाथा अल्लाट, सचिन गुजर ( विश्वस्त, श्री साईबाबा मंदिर देवस्थान शिर्डी), चंद्रकांत बागुल ( कोपरगाव तालुकाध्यक्ष काँग्रेस कमिटी अनु.जाती विभाग), संतोष गायकवाड ( जिल्हा कार्याध्यक्ष अहमदनगर जिल्हा काँग्रेस कमिटी), जिल्हा उपाध्यक्ष यादव त्रिभुवन, सोपान धेनक, सोनू गायकवाड, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नामदेवराव चांदणे, डॉ.साळवे व जिल्ह्यातील काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
