कोपरगाव शहराचा झालेला विकास विरोधकांना पाहवत नाही आ.आशुतोष काळे वाटेला गेला तर सोडणार नाही आ.आशुतोष काळेंचा विरोधकांना गर्भित ईशारा…

Uncategorized

कोपरगाव प्रतिनिधी:-
कोळपेवाडी वार्ताहर – ज्यांच्याकडे विकासाची दूरदृष्टी नाही त्यांच्यावर
२०१४ ला विश्वास ठेवल्यामुळे कोपरगाव शहराच्या विकासाची अधोगती होवून जनतेला मोठी किंमत मोजावी लागली आहे. याऊलट मागील चार वर्षात पिण्याच्या पाण्याच्या प्रश्न मार्गी लागण्याबरोबरच कोपरगाव शहराचा झालेला विकास कोपरगाव शहरातील सुज्ञ जनता पाहत आहे अनुभवत आहे. जनतेला दिलेल्या वचनांची पूर्तता करून कोपरगाव शहराची धुळगाव ओळख पुसण्यात यशस्वी झालो आहे. त्यामुळे कोपरगाव शहरातील नागरिक समाधानी आहेत याचे विरोधकांना दु:ख होत असून कोपरगाव शहराचा झालेला विकास विरोधकांना बघवत नाही. त्यामुळे चांगल्या कामात विघ्न आणण्याचे पाप विरोधक करीत असून मुद्दामहून आमच्या वाटेला गेला तर सोडणार नाही असा गर्भित ईशारा आ. आशुतोष काळे यांनी कोल्हेंना दिला आहे.

आ. आशुतोष काळे यांच्या प्रयत्नातून कोपरगाव शहराच्या विकासासाठी जिल्हा नियोजन योजनेतून मिळालेल्या ५ कोटी २० लक्ष रुपये निधीतील विविध विकास कामांचे ७७ व्या स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधत आ. आशुतोष काळे यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले. यावेळी कोल्हेंनी देखील संबंध नसतांना या कामाचे भूमिपूजन करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी त्यांना आ. आशुतोष काळे यांनी शहरातील द्वारकानगरी शंकरनगर येथे झालेल्या जाहीर सभेत ईशारा दिला आहे.

यामध्ये प्रभाग क्र. १ मध्ये समतानगर भागात गायकवाड घर ते पाटोळे घर रस्ता डांबरीकरण करणे,प्रभाग क्र. २ मध्ये भामानगर अंतर्गत रचना पार्क लगत नगर-मनमाड रस्त्याला जोडणारे दोन रस्ते मजबुतीकरण करणे व सुखशांतीनगर मधील चारीवरील पुलाचे काम करणे, प्रभाग क्र. ३ मध्ये वैशाली स्कुटर ते अमरधाम रस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरण करणे,प्रभाग क्र. ४ मध्ये वडांगळे वस्ती ते शेखर रहाणे घर रस्ता डांबरीकरण करणे व जाकीरभाई घर ते अमोल शर्मा घर रस्ता डांबरीकरण करणे,प्रभाग क्र. ६ मध्ये छत्रपती शिवाजी महाराज स्मारक ते तहसील कार्यालय रस्ता डांबरीकरण करणे व श्री शनी मंदिर ते धारणगाव रस्ता डांबरीकरण करणे,प्रभाग क्र. ७ मध्ये खंदकनाल्यावर कासलीवाल संरक्षक भिंतीसमोर पुलाचे बांधकाम करणे,प्रभाग क्र. ९ मध्ये धारणगाव रोड श्रद्धा टॉवर्स ते सेवानिकेतन रस्ता डांबरीकरण करणे व इंदिरापथ रोड झवेरी हॉस्पिटल ते डॉ. नरोडे घर रस्ता डांबरीकरण करणे,प्रभाग क्र. १० मध्ये श्रीराम मंदिर ते सेवानिकेतन स्कुल समोरून जाणारा रस्ता बाळू दीक्षित घरापर्यंत मजबुतीकरण व डांबरीकरण करणे,प्रभाग क्र. ११ मध्ये श्री मारुती मंदिर ते गणपती मंदिर सुशोभिकरण करणे व अंबिका मेडिकल ते श्री दत्त मंदिर रस्ता काँक्रीटीकरण करणे,प्रभाग क्र. १२ मध्ये बबलू दुकळे घर ते जुबेदा आपा घर रस्ता, दिपक घाटे घर ते फौजिया आपा घर ते मिटकर घर रस्ता व तायरा आपा घर ते मोहम्मद शेख घर शरीफ शेख घर रस्ता काँक्रीटीकरण करणे,प्रभाग क्र. १४ मध्ये पाखले घर ते पंडोरे घर रस्ता डांबरीकरण करणे व गोदावरी नदीवरील छोटा पूल ते मोहिनीराजनगर रस्ता डांबरीकरण करणे. तसेच हद्दवाढ झालेल्या भागात गवारेनगर तारांगण शॉप ते यमुना बिल्डिंग ते सिनगर बिल्डिंग ते साई यमुना बिल्डिंग कॉर्नर ते रॉयल ड्रीम सिटी रस्ता डांबरीकरण करणे, द्वारकानगरी काका कोयटे घरासमोरील सुतार लोहार समाज मंगल कार्यालय ते शंकरनगर मध्ये लोहार सर घर रस्ता डांबरीकरण करणे व शंकरनगर व द्वारकानगरी यांना जोडणारा पूल बनवणे आदी कामांचे भूमिपूजन आ. आशुतोष काळे यांच्या हस्ते पार पडले.

यावेळी पुढे बोलतांना आ. आशुतोष काळे म्हणाले की, मतदार संघातील जनतेने दाखविलेल्या विश्वासातून तुमचा लोकप्रतिनिधी म्हणून विकास कामांसाठी निधी मिळवून देणे हि माझी जबाबदारी आहे. ती जबाबदरी सक्षमपणे पार पाडतांना पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्याचे दिलेले वचन पूर्ण करण्यासाठी १३१.२४ कोटी निधी देवून पाच नंबर साठवण तलावाचे काम पूर्णत्वाकडे जात आहे. त्याचबरोबर कोपरगाव शहराच्या विकासासाठी यापूर्वी जवळपास २० कोटी, हद्दवाढ झालेल्या भागाच्या विकासासाठी १० कोटी व जिल्हा नियोजनमधून ५.२० कोटी निधी आणला आहे. त्यामुळे या विकासकामांचे भूमिपूजन करण्याचा मला अधिकार असून प्रशासकीय अधिकाऱ्यांनी उपस्थित राहणे त्यांचे कर्तव्य आहे. त्यामध्ये विरोधकांना बोलण्याचा कुठलाही अधिकार नाही. मात्र ज्यांचा काडीचा सबंध नसतांना मागील ३५ ते ४० वर्षापासून न केलेल्या कामाचे श्रेय घेण्याची त्यांची परंपरा अबाधित ठेवण्यासाठी त्यांनी केलेला आटापिटा केविलवाणा आहे. त्यांना विकास करता आला नाही व आता होत असलेला विकास त्यांना देखवत नाही. हे कोपरगाव शहरातील सुज्ञ नागरिक पाहत आहे. या चार वर्षात आपण केलेली विकास कामे जनतेपर्यंत पोहोचली असून विकास काय असतो हे चार वर्षात कोपरगाव शहराच्या झालेल्या बदलातून स्पष्ट दिसत आहे. त्यामुळे पुन्हा संधी आपल्याला मिळणार असल्यामुळे त्यांचा जळफळाट सुरु आहे हे मी समजू शकतो. परंतु मी मुद्दामहून कुणाच्या वाटेला जात नाही तो माझा स्वभाव नाही. परंतु विनाकारण माझ्या वाटेला कोणी गेला तर सोडणार नाही असे आ. आशुतोष काळे यांनी यावेळी कोल्हेंना ठणकावून सांगितले. यावेळी कोपरगाव नगरपरिषदेचे मुख्याधिकारी शांताराम गोसावी, बांधकाम अभियंता जनार्दन फुलारी, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते व विविध प्रभागातील स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

उपनगरांसाठी १० कोटी पहिला टप्पा —-

चौकट :- हद्दवाढ झालेल्या भागातील कोपरगाव शहराच्या विकासासाठी १० कोटी पहिला टप्पा आहे. यातून सर्वच विकासाची काही कामे पूर्ण होतील. परंतु सर्वच विकासकामे पूर्ण करायची असून त्यासाठी अधिकचा निधी मिळविण्यासाठी माझे प्रयत्न सुरु आहेत. त्यामुळे शहरातील नागरिकांना मिळणाऱ्या सोयी सुविधा प्रमाणे हद्दवाढ झालेल्या भागातील नागरिकांना देखील सुविधा मिळवून दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही.- आ.आशुतोष काळे.

फोटो ओळ – कोपरगाव शहरात ५.२० कोटी निधीतून करण्यात येणाऱ्या विकासकामांचे भूमिपूजन प्रसंगी आयोजित सभेत बोलतांना आ. आशुतोष काळे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *