Uncategorized

गोदावरीच्या शांततेसाठी दुतोंड्या मारुती येथे २५ जुलै रोजी जलमहाआरती…

कोपरगाव प्रतिनिधी
(नाशिक):- रामतीर्थ गोदावरी आरती समितीच्या वतीने गेल्या तीन वर्षांपासून दक्षिण गंगा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पवित्र गोदावरी नदीची दुतोंड्या मारुती मूर्ती जवळ दररोज नियमित महाआरती केली जात आहे. पाऊस,उन्हाळा अथवा हिवाळा अशा कोणत्याही ऋतूमध्ये ही सेवा अखंडपणे सुरू असून, गोदामातेप्रती श्रद्धा आणि कृतज्ञतेचे हे एक अनोखे उदाहरण ठरले आहे.

सध्या नाशिक शहर व परिसरात झालेल्या अतिवृष्टीमुळे गोदावरी नदीला मोठा पूर आला आहे. पुराची तीव्रता इतकी आहे की दुतोंड्या मारुतीच्या मूर्तीच्या डोक्यावरून पाणी वाहू लागले की त्या परिस्थितीला महापूर मानले जाते.

यंदाही अशीच परिस्थिती निर्माण झाली असून, गोदावरीने रौद्र रूप धारण केले आहे.
दरम्यान, पावसाचा जोर आता काहीसा कमी होत असल्याचे दिसून येत आहे.
या पार्श्वभूमीवर शुक्रवार,दि. २४ जुलै २०२६ रोजी सायंकाळी ६.३० वाजता दुतोंड्या मारुती मंदिर परिसरात पुराच्या पाण्यात विशेष जलमहाआरतीचे आयोजण करण्यात आले होते .
या महाआरतीद्वारे गोदामातेला विनम्र प्रार्थना करण्यात आली आहे की, तिचे हे रौद्र स्वरूप शांत व्हावे,जनजीवन पूर्वपदावर यावे आणि समाजावर कोणतेही संकट अथवा आपत्ती ओढवू नये. तसेच सर्वांच्या सुख, शांती, सुरक्षितता आणि समृद्धीसाठी सामूहिक प्रार्थना करण्यात आली आहे.

रामतीर्थ गोदावरी आरती समितीच्या वतीने सर्व भाविक, नागरिक,सामाजिक संस्था तसेच गोदामातेचे भक्त यांनी शुक्रवार,दि. २४ जुलै २०२६ रोजी सायंकाळी ६.३० वाजता दुतोंड्या मारुती येथे होणाऱ्या या पवित्र जलमहाआरतीस मोठ्या संख्येने उपस्थित राहून सामूहिक प्रार्थनेत सहभागी झाल्या बद्दल सर्वांचे कौतुक आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *