जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या स्पर्धा निधी तथा क्रीडा अनुदान न दिल्याने क्रीडा शिक्षक समितीच्या वतीने असहकाराचा निर्णय:- श्री अरुण चंद्रे अध्यक्ष क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघ…

Uncategorized

कोपरगाव प्रतिनिधी:-
जिल्हा क्रीडा कार्यालय अहमदनगर यांनी गत वर्षी २०२२-२३ मध्ये तालुकास्तर, जिल्हास्तर स्पर्धांची जबाबदारी तालुका क्रीडा समितीच्या क्रीडाशिक्षकांवर देऊन स्पर्धा यशस्वी रीत्या संपन्न झाल्या.कोरोनाच्या प्रदीर्घ काळा नंतर शासकीय क्रीडा स्पर्धा घेण्यात आल्या. परंतु या स्पर्धा क्रीडा शिक्षकांनी क्रीडा समितीच्या माध्यमातुन यशस्वीपणे संपन्न केल्या या स्पर्धाची बिले व एकूण खर्च जिल्हा क्रीडा अधिकारी यांना वेळेत सादर करण्यात केला. परंतु जिल्हा क्रीडा अधिकारी यांनी याकडे दुर्लक्ष करीत,मा. जिल्हाधिकारी खर्च मंजूर करत नाही अशी कारणे क्रीडा अधिकाऱ्याच्या मार्फत देवुन हा विषय प्रलंबित ठेवला.तालुक्यातील क्रीडा समितीचे अध्यक्ष श्री.नितीन निकम व इतर समिती सदस्य यांच्याशी चर्चा केल्यानंतर कोपरगांव तालुक्यासह उर्वरीत तालुक्याला देखिल क्रीडा निधी मिळाला नाही असे स्पष्ट झाले त्यामुळे जिल्ह्यातील क्रीडा समिती सह क्रीडाशिक्षकांनी क्रीडा स्पर्धा असहकाराचा निर्णय घेण्यात आला आहे.
प्रत्येक वर्षी क्रीडा शिक्षक मेहनत घेऊन स्पर्धेसाठी संघ तयार करतात आणि क्रीडा स्पर्धा यशस्वी होण्यासाठी झटतात परंतु शासनाचे क्रीडा अधिकारी उदासीनता दाखवुन आणि स्पर्धा झाल्यावर क्रीडा शिक्षकांना क्रीडा निधीपासुन वंचित ठेवतात. त्यामुळेच या वर्षीच्या क्रीडा स्पर्धा असहकार करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
या प्रसंगी तालुका क्रीडा समितीचे अध्यक्ष श्री नितिन निकम पुढे म्हणाले की दि २५ जुलै २०२३ ला मा.जिल्हा क्रीडा अधिकारी श्रीमती भाग्यश्री बिले , क्रीडा मार्गदर्शक ज्ञानेश्वर खुरंगे , विशाल गर्जे यांच्या उपस्थितीत कोपरगाव आणि राहता तालुक्याची सभा संपन्न झाली त्यामध्ये मा.जिल्हा क्रीडा अधिकारी यांना निवेदन देण्यात आले त्यावेळी कोपरगाव तालुक्याचे तत्कालीन क्रीडा अधिकारी दिलीप दिघे यांच्या निर्देशानुसार कोपरगाव तालुका क्रीडा स्पर्धेच्या एकूण खर्चाची फाईल दि. २८ एप्रिल २०२३रोजी जमा करण्यात आली परंतु चार महिने होऊन सुद्धा क्रीडा स्पर्धेचा खर्च तालुक्यांना देण्यात आलेला नाही . दि २५जुलै २०२३ रोजी च्या मिटिंग मध्ये कोपरगाव आणि राहता तालुका क्रीडा शिक्षकांना आश्वासन देण्यात आले की चार दिवसात तुमची सर्व बिले मंजूर करण्यात येतील परंतु आजपावेतो खर्च मंजूर करण्यात आला नाही. त्यामुळे तालुका , जिल्हा स्पर्धावर असहकाराचा निर्णय घेण्यात आला आहे असे त्यांनी स्पष्ट केले.
या प्रसंगी श्री.मकरंद कोऱ्हाळकर , नारायण शेळके , दत्ता देवकर , धनंजय देवकर , शिवप्रसाद घोडके ,अनुप गिरमे, शिवराज पाळणे, आकाश लकारे आदीसह क्रीडा समितीचे सर्व सदस्य उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *