


कोपरगाव प्रतिनिधी:-

सरपंच सेवा संघ महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने प्रतिष्ठित समाजला जाणारा “आदर्श सरपंच ” पुरस्कार दिनांक 30-7-2023 रविवार रोजी,मान कर्तुत्वाचा सन्मान नेतृत्वाचा, सन्मान सोहळा 2023 या भव्य दिव्य कार्यक्रमांमध्ये प्रमुख मान्यवर आदर्श सरपंच श्री भास्करराव पेरे, हवामान तज्ञ श्री पंजाबराव डख, महाराष्ट्र सरपंच संघाचे संस्थापक श्री यादवरावजी पावसे, डॉ. सुधा कांकरिया यांच्या हस्ते काकडी /मल्हारवाडी (विमानतळ ) ग्रामपंचायतच्या,
विद्यमान सरपंच सौ. पूर्वा रवींद्र गुंजाळ यांना देण्यात आला


यावेळी वेळोवेळी मार्गदर्शन करणारे सरपंच संघटित चळवळीचे नेते श्री बाबासाहेबजी पावसे, नागेबाबा उद्योग समूहाचे श्री अरुणभाऊ कडू, श्री साहेबरावजी घाडगे, गोसावी समाजाचे नेते श्री राजेंद्रजी गिरी, रविभाऊ गुंजाळ आदी उपस्थित होते.
