राष्ट्रपतींच्या उपस्थितीत झालेल्या अखिल भारतीय आयुर्वेद महाअधिवेशनात डॉ. रामदास आव्हाड सन्मानित…

Uncategorized

कोपरगाव प्रतिनिधी:-
महाकाल नगरी उज्जैन येथे अखिल भारतीय आयुर्वेदाचे 59 वे महाधिवेशन दि 27-30 संपन्न झाले.या भव्य दिव्य अखिल भारतीय आयुर्वेद महासंमेलनाचे उदघाटन भारताचे राष्ट्रपती महामयीन श्री रामनाथजी कोविंद यांचे शुभहस्ते झाले .मध्यप्रदेश चे मुख्यमंत्री आ शिवराजजी चौहान ,राज्यपाल श्री .मंगुभाई पटेल ,आयुषमंत्री ,उच्च शिक्षणमंत्री ,महासंमेलन अध्यक्ष पदमश्री पद्मभूषण डॉ देवेंद्र त्रिगुणाजी सह अनेक उच्चपदस्थ यावेळी उपस्थित होते .चार दिवस चाललेल्या या अधिवेशनात काही निवडक प्रसिद्ध वैद्यांची आयुर्वेदावर व्याख्याने झाली .कोपरगाव येथील आयुर्वेदाचार्य व महाराष्ट्र आयुर्वेद संमेलन अध्यक्ष डॉ रामदास आव्हाड यांचे *पंचकर्म एक वज्रास्त्र * या विषयावर माहितीपूर्ण व्याख्यान झाले

.सम्पूर्ण भारतातून आलेल्या वैद्यगणासमोर डॉ रामदास आव्हाड यांना सन्मानित करण्यात आले .प्रदेश संमेलन अध्यक्ष म्हणून केलेल्या उत्कृस्ट कार्याबद्दलही त्यांचा आयुर्वेद संशोधन अनुसंधाचे अध्यक्ष डॉ नारायण आचार्य यांचे हस्ते स्मृतिचिन्ह व सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले . आयुर्वेदाचे भविष्य उज्वल असल्याचे आ राष्ट्रपती कोविंद यांनी आपल्या वक्तव्यातून व्यक्त केले .मुख्यमंत्री चौहान व अन्य सर्व वक्त्यांनी आयुर्वेदाबद्दल गौरवोद्गार काढले .यावेळी पंजाब आयुर्वेद सलाहकार डॉ राकेश शर्मा यांची अखिल भारतीय आयुर्वेद महासंमेलनाचे नूतन अध्यक्ष म्हणून तर डॉ रामदास आव्हाड यांची महाराष्ट्र आयुर्वेद संमेलन अध्यक्ष म्हणून सर्वानुमते पुन्हा फेरनिवड करण्यात आली …राष्ट्रीय स्तरावर डॉ रामदास आव्हाड यांच्या कार्याची दखल वेळोवेळी घेतली जाते .हि गोस्ट कोपरगावकरांसाठी अभिमानास्पद आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *