कोपरगाव तालुक्यातील चासनळी शिवारात गावठी हातभट्टी दारू अड्ड्यावर छापे 1,22,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त…

Uncategorized

कोपरगाव प्रतिनिधी:-
दि. 23/07/2023 रोजी Dysp संदीप मिटके यांना गुप्त बातमीदार मार्फत कोपरगाव तालुक्यातील चासनळी शिवारात गावठी हातभट्टी दारू अड्डे व हातभट्टी दारू तयार करत आहेत अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने त्यांनी आपले पथकातील अंमलदार यांना सदर ठिकाणी जाऊन छापा टाकण्याचे आदेश दिल्याने पथकातील अंमलदार यांनी कोपरगाव तालुक्यातील चासनळी परिसरातील सर्व गावठी हातभट्टी दारू अड्ड्यावर छापा टाकून गावठी हातभट्टी दारू तयार करण्याचे कच्चे रसायन, तयार गावठी हातभट्टी दारू यांचा नाश करण्यात आले.
आरोपी. क्र.) 1 शिवाजी संपत माळी, 2) मिथुन छगन माळी रा माणकेश्वर नगर, चासनळी ता.कोपरगाव
84,000/- रु. कि.चे 1200 लिटर गावठी हातभट्टी दारू तयार करण्याचे कच्चे रसायन ( आंबट उग्र वासाचे किं. अं.)
आरोपी. क्र.) 3. विशाल कृष्णा दळे रा माणकेश्वर नगर, चासनळी ता.कोपरगाव
31,500/- रु. कि.चे 450 लिटर गावठी हातभट्टी दारू तयार करण्याचे कच्चे रसायन ( किं.अं.)
2,000/- रू किमतीची 20 लिटर तयार गावठी हातभट्टी दारू( आंबट उग्र वासाची किं. अं.)
एकूण 1,21,500/- रुपये
वरील वर्णनाचा व किमतीचा प्रोहिबिशन गुन्ह्याचा माल आरोपींचे ताब्यातून जप्त केला असून सर्व आरोपींविरुद्ध कोपरगाव तालुका पो. स्टे. येथे मुंबई दारूबंदी कायदा कलम 65 ( फ) (क) (ड ) (ई) प्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
अचानक केलेल्या या कारवाईमुळे कोपरगाव तालुक्यातील अवैध धंदे चालकांचे धाबे दणाणले आहेत.
सदरची कारवाई मा. श्री. राकेश ओला पोलीस अधीक्षक, अपर पोलीस अधीक्षक मा. स्वाती भोर, Dysp संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली HC अप्पासाहेब थोरमिसे,PN अशोक शिंदे, PC दिनेश कांबळे,PC शाम जाधव आदींनी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *