श्री संत शिरोमणी सावता माळी महाराज पुण्यतिथी सोहळ्याचे आयोजन…

Uncategorized

कोपरगाव प्रतिनिधी:- श्री संत शिरोमणी सावता माळी महाराज यांची पुण्यतिथी सोहळा आयोजित करण्यात आला आहे या निमित्ताने श्री संत शिरोमणी सावता महाराज यांचे पूजन व श्री सत्यनारायण महापूजा 16 जुलै रोजी संपन्न झाली तसेच रविवार दिनांक 23 जुलै 2023 रोजी सकाळी दहा वाजता ह. भ .प .बाळासाहेब महाराज कुळधरण सर यांचे जाहिर हरी कीर्तन व शेतीविषयक प्रबोधन कार्यक्रम आयोजित केला असून आपण याचा लाभ घ्यावा यानंतर महाप्रसादाचे वाटप होणार आहे या महाप्रसादाचे मानकरी कै.सुनंदा अनिल गिरमे यांच्या स्मरणार्थ श्री व सौ अनुप अनिल गिरमे सर व श्री व सौ वैभव सूर्यभान गिरमे नगरसेवक आहे. कार्यक्रमाचे ठिकाण कोपरगाव शहरांमधील माळी बोर्डिंग कोर्ट रोड कोपरगाव या ठिकाणी आहे माळी बोर्डिंग चे अध्यक्ष बाळासाहेब पांढरे, विश्वस्त पद्मकांजी कुदळे, माजी अध्यक्ष रवी काका बोरावके, नवले साहेब, किरण बोरावके, प्रकाश रासकर , रवींद्र चौधरी, विशाल राऊत, बाप्पू वढणे, सतीश भुजबळ, विजय ओढणे, अनुप गिरमे, वैभव गिरवे ,विरेन बोरावके , रवी काळने , तुषार जमदाडे, महेंद्र बोरावके, राजेंद्र बोरावके, ओंकार ओढणे ,संकेत पाटील ,अजय भुजबळ, प्रथमेश राऊत, अक्षय वैद्य, रोहित नवले ,महात्मा फुले मंडळ माळी बोर्डिंग सावित्रीबाई फुले महिला मंडळ महात्मा फुले युवा मंच,महात्मा फुले मंडळ कोपरगाव व माळी बोर्डिंग व्यवस्थापन समिती आदींनी या कार्यक्रमासाठी उपस्थित राहावे असे आव्हान करण्यात आले आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *