लाच प्रकरणी संतोष गर्जे, महसूल सहाय्यक, यास न्यायालयीन कोठडी मंजूर…

Uncategorized

लाच प्रकरणी संतोष गर्जे, महसूल सहाय्यक, यास न्यायालयीन कोठडी मंजूर…

कोपरगाव प्रतिनिधी:-
प्रस्तुत बातमीतील हकीगत अशी की, दि.१५/०६ / २०२३ रोजी आरोपी लोकसेवक संतोष सहदेव गर्जे, वय – ३८ वर्ष, महसूल सहाय्यक, वर्ग-३, फौजदारी संकलन शाखा, तहसिल कार्यालय, शेवगांव, ता शेवगांव, जि. अहमदनगर याचेविरुध्द यशस्वी सापळा कारवाई करण्यात आली होती सदर बाबत शेवगांव पो स्टे गुरन ५१८/ २०२३ भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम सन १९८८ चे कलम ७ प्रमाणे दि.१६ / ६ / २०२३ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची सापळा कारवाई पोलीस निरीक्षक श्रीमती आदमाने लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिक यांनी केली असून सदर गुन्हयाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक श्री. शरद गोर्डे, विभाग, अहमदनगर हे करीत आहेत. लाचलुचपत प्रतिबंधक

सदर गुन्हयात आरोपी लोकसेवक संतोष सहदेव गर्जे यास दि.१६ / ६ / २०२३ रोजी अटक करण्यात आली होती. आरोपी लोकसेवक गर्जे यास पोलीस कोठडी मिळणेबाबतच्या विनंती रिपोर्टासह दि.१६/६/२०२३ रोजी मा. श्रीमती माधुरी बरालिया, विशेष न्यायालय, अहमदनगर यांचे न्यायालयात हजर केले असता मा. न्यायालयाने आरोपी लोकसेवक गर्जे यास दि.१९ / ०६ / २०२३ पावेतो ०३ दिवस पोलीस कोठडी मंजूर केली होती. आज दि.१९/०६/२०२३ रोजी आरोपी लोकसेवक गर्जे यास मा.न्यायालयाने न्यायालयीन कोठडी मंजूर केली असून आरोपी लोकसेवक गर्जे याची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.
कोणीही लोकसेवक सर्व सामान्य जनतेला त्यांचे काम करुन देण्यासाठी लाचेची मागणी करत असेल तर त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग कार्यालय, अहमदनगर येथे खालील दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन पोलीस उप अधीक्षक श्री. प्रविण लोखंडे यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *