एस.एस.जी.एम.कॉलेजमध्ये रविवारी वार्षिक पारितोषिक वितरणाचे आयोजन’…..

Uncategorized

एस. एस. जी. एम कॉलेजमध्ये रविवारी होणार गुणवंतांचा सत्कार……
कोपरगाव प्रतिनिधी:-येथील रयत शिक्षण संस्थेच्या एस. एस. जी. एम. कॉलेजमध्ये रविवार दि.१८ जून रोजी वार्षिक पारितोषिक वितरण व कै. सौ. सुशिलाबाई(माई ) शंकररावजी काळे आंतरमहाविद्यालय राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा पारितोषिक वितरण समारंभाचे आयोजन करण्यात आलेले आहे. या समारंभासाठी प्रमुख अतिथी म्हणून ज्येष्ठ गजलकार व पत्रकार, पुणे येथील मा. श्री प्रदीप निफाडकर हे उपस्थित राहणार असून कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान रयत शिक्षण संस्थेचे व्हाईस चेअरमन व महाविद्यालय विकास समितीचे चेअरमन मा. श्री ॲड. भगीरथ शिंदे हे भूषविणार आहेत. या कार्यक्रमासाठी मा. आमदार आशुतोष अशोकराव काळे यांच्यासह रयत शिक्षण संस्थेच्या जनरल बॉडीचे सदस्य मा. श्री. अशोकराव काळे, मा. श्री. बिपिनदादा शंकरराव कोल्हे, मा. श्री. संदीप वर्पे, मा. श्री. पद्मकांत कुदळे, मा. श्री. कारभारी आगवन, मा. श्री.मच्छिंद्र रोहमारे,मा. श्री. बाळासाहेब कदम, मा. श्री.अरुण चंद्रे, तसेच महाविद्यालय विकास समितीचे सदस्य मा. सौ. चैतालीताई काळे, मा. श्री. विवेक कोल्हे, मा. श्री. सुनील गंगुले यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.
सत्कारप्राप्त गुणवंतांमध्ये कै. सौ. सुशिलाबाई (माई) शंकररावजी काळे आंतरमहाविद्यालयीन राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत प्रथम क्रमांक प्राप्त प्रणाली पाटील, बेलापूर. द्वितीय क्रमांक प्राप्त अन्वी जाधव, माजलगाव.तृतीय क्रमांक प्राप्त रोहन कवडे,पुणे. इत्यादीं बरोबरच महाविद्यालयाच्या कला, क्रीडा, सांस्कृतिक आणि विद्यापीठीय व बोर्ड परीक्षेत यश प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांचा तसेच प्राध्यापकांचा समावेश असणार आहे.
तरी या वार्षिक पारितोषिक वितरण समारंभासाठी सर्व गुणवंत – प्रतिभावंत विद्यार्थी, महाविद्यालयाचे विद्यार्थी, पालक,शिक्षक- शिक्षकेतर सेवक आणि परिसरातील रयतप्रेमी यांनी उपस्थित रहावे, असे आवाहन महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य डॉ. आर.आर. सानप, सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ. बाबासाहेब शेंडगे, जिमखाना समिती चेअरमन डॉ. अर्जुन भागवत, शारीरिक शिक्षण संचालक डॉ. विशाल पवार, प्रा. दत्ता देवकर, उपप्राचार्य प्रा. सुभाष रणधीर, प्रा.अरुण देशमुख, प्रा. रामभाऊ गमे यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *