श्रीमान गोकुळचंदजी विद्यालयात नवगतांचा प्रवेशोत्सव समारंभ उत्साहाने संपन्न…

Uncategorized

कोपरगांव प्रतिनिधी:-
श्रीमान गोकुळचंदजी विदयालयांत आज १५जुन शाळेचा पहीला दिवस विदयार्थींचा प्रवेशोत्सव समारंभ उत्साहाने संपन्न झाला.
या कार्यक्रमाला शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा सौ.सुवर्णा अमृतकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होत्या.
या प्रसंगी विदयालयात प्रशस्त रांगोळी काढण्यात आलेल्या होत्या. सर्व विदयार्थीना सौ.सुवर्णा अमृतकर,कोपरगांव एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष कैलास ठोळे,सचिव श्री.दिलीप अजमेरे,सहसचिव सचिन अजमेरे,सदस्य राजेश ठोळे,संदीप अजमेरे,डाॕ.अमोल अजमेरे यांच्या हस्ते गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले.तसेच मोफत पाठ्यपुस्तके योजने अंर्तगत शालेय पाठ्यपुस्तकांचे देखिल या प्रसंगी वाटप करण्यात आले.


प्रारंभी कै.गोकुळचंदजी ठोळे यांच्या पुतळ्याला मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार घालण्यात आला.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपमुख्याध्यापक रमेश गायकवाड यांनी केले.
यावेळी कोपरगांव एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष कैलास ठोळे,सचिव श्री.दिलीप अजमेरे,स्थानिक स्कुल कमेटीचे चेअरमन चंद्रकांत ठोळे,सहसचिव सचिन अजमेरे ,डाॕ. अमोल अजमेरे,श्री दिलीप तुपसैंदर स आदींनी सर्व विदयार्थीना शैक्षणिक वर्षाच्या आरंभी शुभेच्छा दिल्या.या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन सुरेश गोरे यांनी केले तर आभार पर्यवेक्षिका उमा रायते यांनी मानले.
या कार्यक्रमाला अनिल अमृतकर ,अतुल कोताडे,कुलदीप गोसावी,दीलीप कुडके ,अनिल काले आदी शिक्षक, शिक्षिका व पालक विद्यार्थी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *