श्रीमंत पवार सरकारचे सोमेश्वर महादेव देवस्थान वतीने गुढीपाडवा उत्सव साजरा…

Uncategorized

कोपरगाव प्रतिनिधी:-
श्रीमंत पवार सरकार देवास ज्युनिअर संस्थानचे सोमेश्वर महादेव देवस्थान येथे नवं वर्ष शुभारंभ…गुढीपाडवा निमित्ताने सौ. उज्वलाताई व श्री.नितीनराव शिंदे (प्रगतशील शेतकरी) यांचे शुभहस्ते सोमेश्वर महादेव रुद्र अभिषेक पुजा, आरती करुन पारंपरिक पद्धतीने गुढी उभारण्यात आली.
या प्रसंगी पानिपत रणसंग्रामातील वीरगती योध्दा श्रीमंत सरदार यशवंतराव पवार, श्रीमंत राघोबादादा पेशवा, श्रीमंत महामहीम यशवंतराव पवार (दूसरे) यांचे प्रतिमा पुजन करण्यात आले.
या प्रसंगी देवस्थानचे वतीने प्रमुख महेंद्र पाटील गुढी पाडवा निमित्ताने शुभेच्छा दिल्या.मुख्य कार्यकारी अधिकारी सुशांत घोडके त्यांचे स्वागत करण्यात आले. पौरोहित्य रविंद्रशास्री जोशी, नंदू शेंडे (गुरव) यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *