
कोपरगाव प्रतिनिधी:-
नगरपालिकेचे इलेक्शन लांबले असल्याकारणाने…
नगरपालिकेने जनतेच्या सुविधेसाठी आधुनिकता कायमस्वरूपी स्वीकारावी आमलात आणावी….
ही काळाची गरज…
मागील गेल्या दीड वर्षापासून नगरपालिकेचे इलेक्शन झाली नाही / लांबले आहेत. त्यामुळे पूर्वी प्रमाणे आपापल्या वार्डातील नगरसेवकांकडे कुठल्याही प्रकारची नगरपालिकेच्या सुविधा बाबतची तक्रार किंवा मागणी करता येत होती.आत्ता ती करता नाही येत. समस्या मोठी असेल गंभीर असेल तर नगरसेवक तातडीने त्या विभागाच्या अधिकाऱ्यांना /कर्मचाऱ्यांना त्या वॉर्ड घेऊन जात असत.
आता पाणीपुरवठा , अस्वच्छ पाणी , आरोग्य , रस्ते , गटारी , डासांसाठी औषध फवारणी , कचरा , मोकाट जनावरां विषयी तक्रारी , रस्त्यातील अडथळे , रस्त्यांवरील खड्डे , बांधकाम विषयी परवानगी , बांधकामाचे अतिक्रमणे , विविध प्रकारचे दाखले जन्म , मृत्यू इ. शहर विकासाचे विविध कामे .इत्यादी कामे नगरपालिकेकडे असतात. प्रत्येक कामासाठी नागरिकांना नगरपालिकेत जावे लागते. तिथे बराच वेळ थांबावे लागते. ज्येष्ठ नागरिकांना माता भगिनींना याचा मोठ्या प्रमाणात त्रास होतो.कधी अधिकाऱ्यांची / कर्मचाऱ्यांची भेट होईल ,नाही होणार यामुळे मोठ्या प्रमाणात गैरसोय होती व नागरिकांचे निष्कारण वेळ वाया जातो व त्यामुळे मनस्ताप सहन करावा लागतो व गैरसोईला सामोरे जावे लागते.
तसेच अधिकाऱ्यांचाही वेळ जातो. हा वेळ अधिकाऱ्यांचा वाचला तर ते शहर विकासाच्या कामासाठी जास्त वेळ देऊ शकतील व गावाची प्रगती होऊ शकते.अनेक वेळा नागरिकांनी दिलेले कामाच्या मागणीचा अर्ज ही सापडत नाहीत.
यासाठी नगरपालिकेने तातडीने एक हेल्पलाइन नंबर कॉम्प्युटरराईड चालू करावा जेणेकरून ती तक्रार किंवा केलेली मागणी ही त्यात कायमस्वरूपी तारखेनिशी नोंद राहील . तसेच एक व्हाट्सअप नंबरही जाहीर करावा , जनतेला द्यावा जेणेकरून फोटोसह व नावासह त्या ठिकाणी तक्रार व्हाट्सअप वर पाठवता येईल
जेणेकरून नागरिकांचा वेळ वाचेल व त्या व्हाट्सअप व संगणक प्रणाली नंबर वरच नगरपालिकेने केलेल्या कारवाईचे फोटो टाकावा आणि ते काम तातडीने मार्गी लावावे.
नगरपालिकेला जनता नागरिक मोठ्या प्रमाणात कर /टॅक्स भरतात .हा स्वतःच्या कुटुंबा साठी व सोयीसाठीच ते कर देतात. भरलेल्या करातून नागरिकांना सुविधा मिळावी व निष्कारण हेल्पटे मारून मनस्ताप सहन करावा लागू नये म्हणून नगरपालिकेने थोडे आता आधुनिक तिकडे कायमस्वरूपी वळणे गरजेचे आहे .तरी निदान तातडीने ही सुविधा चालू करावी व प्रत्येक वॉर्ड मध्ये , मेन चौकात त्या नंबर चे फ्लेक्स लावावे व नागरिकांना दिलासा द्यावा ही नगरपालिकेकडे मागणी…..
