प्रभाग क्र.३ मधील ३७ लाख ७३ हजार रुपयांच्या विकासकामांना स्नेहलताताई कोल्हे व विवेकभैय्या कोल्हे यांच्या प्रयत्नामुळे प्रशासकीय मंजुरी…

Uncategorized

कोपरगाव प्रतिनिधी:- माजी आमदार तथा भाजपच्या प्रदेश सचिव स्नेहलताताई कोल्हे आणि सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक युवा नेते विवेकभैय्या कोल्हे यांच्या प्रयत्नामुळे कोपरगाव शहरातील विविध कामांसाठी सन २०२२-२३ (जिल्हा स्तर) जिल्हा नियोजन समिती विविध योजनांतर्गत ७ कोटी २७ लाख ६५ हजार ८२९ रुपये एवढा विक्रमी निधी मंजूर झाला आहे. त्यामध्ये नवीन प्रभाग क्र.३ मधील ३७ लाख ७३ हजार रुपयांच्या विकासकामांसाठी तसेच याच प्रभागाला जोडणाऱ्या मुख्य रस्त्याच्या १ कोटी ४२ लक्ष रुपयांच्या कामाला प्रशासकीय मंजुरी मिळाली आहे.
नवीन प्रभाग क्र.३ मधील वेगवेगळ्या विकासकामांसाठी ३७ लाख ७३ हजार रुपयांचा निधी शासनाने मंजूर केला आहे. या निधीतून कलविंदर दडीयाल यांचे घर ते झावरे घरापर्यंत साईडपट्टीसह पेव्हर ब्लॉक बसविणे (४९,४७५८ रुपये), रुईकर यांचे घर ते गजानन अपार्टमेंटपर्यंत साईडपट्टीसह पेव्हर ब्लॉक बसविणे (४९,८४८४ रुपये), भामानगरअंतर्गत रचना पार्कलगत नगर-मनमाड महामार्गाला जोडणाऱ्या दोन रस्त्यांचे मजबुतीकरण व डांबरीकरण करणे (२७,८०,००० रुपये) अशी कामे करण्यात येणार आहेत. तसेच नवीन प्रभाग क्र.३ ला जोडणाऱ्या मुख्य रस्त्यांच्या कामालादेखील प्रशासकीय मंजुरी मिळाली आहे. या कामावर १ कोटी ४२ लक्ष रुपये खर्च होणार आहे. यामध्ये गोदावरी पेट्रोल पंप ते समता टिनीटोय स्कूल रोडचे (मार्केट यार्ड रोड) मजबुतीकरण व डांबरीकरण (१,०९,९७,९५० रुपये),टाकळी नाका (निवारा कॉर्नर) ते माऊली ॲग्रोपर्यंतच्या रस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरण करणे (३२,४५,८४० रुपये) या कामांचा समावेश आहे. नवीन प्रभाग क्र.३ मधील रस्त्यांचे मजबुतीकरण व डांबरीकरण तसेच पेव्हर ब्लॉक बसविण्याच्या कामासाठी शासनाकडून निधी मिळावा, यासाठी माजी आमदार तथा भाजपच्या प्रदेश सचिव स्नेहलताताई कोल्हे आणि सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक विवेकभैय्या कोल्हे यांनी विशेष प्रयत्न केल्यामुळे या कामासाठी निधी मंजूर झाला आहे. याबद्दल या प्रभागाचे भाजपचे माजी नगरसेवक जनार्दन कदम व माजी नगरसेविका दीपाताई वैभव गिरमे यांनी स्नेहलताताई कोल्हे व विवेकभैय्या कोल्हे यांचे आभार मानले आहेत. विकासकामांसाठी निधी मिळाल्याबद्दल महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काकासाहेब कोयटे यांनीही आनंद व्यक्त केला आहे.
माजी आमदार स्नेहलताताई कोल्हे तसेच जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक युवा नेते विवेकभैय्या कोल्हे यांनी कोपरगाव शहरातील विविध विकासकामांसाठी शासनाकडून निधी मिळावा म्हणून राज्याचे महसूलमंत्री तथा अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याशी पत्रव्यवहार करून पाठपुरावा केला होता. कोल्हे यांच्या प्रयत्नामुळे महसूलमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या माध्यमातून जिल्हाधिकारी कार्यालय स्तरावरून कोपरगाव शहरातील विविध विकासकामांसाठी सुवर्णजयंती नगरोत्थान महाअभियान (जिल्हा स्तर), लोकशाहीर अण्णाभाऊ साठे दलित वस्ती सुधारणा योजना, नागरी दलितेतर वस्ती सुधारणा योजना अशा विविध योजनांमधून ७ कोटी २७ लाख ६५ हजार ८२९ रुपये एवढा विक्रमी निधी मंजूर झाला आहे. या निधीतून विविध भागातील रस्त्यांचे मजबुतीकरण व डांबरीकरण, पुलांचे व गटारीचे बांधकाम, पेव्हर ब्लॉक बसविणे आदी विविध कामे करण्यात येणार असून, या कामांना प्रशासकीय मंजुरीसुद्धा मिळाली आहे. नवीन प्रभाग क्र.३ मधील रस्त्यांचे मजबुतीकरण व डांबरीकरण, पेव्हर ब्लॉक बसविण्याच्या कामासाठी तसेच शहराच्या इतर भागातील विविध विकासकामांसाठी सन २०२२-२३ च्या जिल्हा नियोजन समिती विविध योजनांतर्गत (जिल्हा स्तर) प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणात निधी मंजूर होऊन त्यास प्रशासकीय मान्यताही मिळाली आहे. त्यामुळे माजी नगरसेवक जनार्दन कदम व माजी नगरसेविका दीपाताई वैभव गिरमे यांनी माजी आमदार स्नेहलताताई कोल्हे व युवा नेते विवेकभैय्या कोल्हे यांचे विशेष आभार मानले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *