

कोपरगाव प्रतिनिधी:-
सहकार महर्षी माजी मंत्री स्व.शंकररावजी कोल्हे साहेब यांच्या जयंतीनिमित्त १०१ गरजू कुटूंबात किराणा साहित्य वाटप करण्यात आले.संजीवनी गेट येथे शिंगणापूर गावच्या युवकांनी एकत्रित येत हा अनोखा उपक्रम आयोजित केला त्याबद्दल भाजपा प्रदेश सचिव मा.आ.सौ.स्नेहलताताई कोल्हे यांनी आयोजकांचे कौतुक करत स्व.कोल्हे साहेबांच्या कार्याला साजेसा उपक्रम केल्याबद्दल धन्यवाद व्यक्त केले आहे.
१०१ गरजू कुटूंबात किराणा साहित्य वितरण सौ.स्नेहलताताई कोल्हे यांच्या हस्ते करण्यात आले.माजी मंत्री स्व.शंकररावजी कोल्हे साहेब यांचा भोजनव्यवस्था हा आग्रही भाग राहिला.कारखाना कार्यस्थळावर आलेल्या मान्यवरांना आग्रहाने भोजनाचा आग्रह करणे,गरजवंताना दैनंदिन अडीअडचणीच्या दृष्टीने सहकार्य करणे ही त्यांची कार्यशैली होती.
स्व.कोल्हे साहेब हे भुकेल्याला अन्न आणि तहानलेल्या पाणी मिळावे यासाठी सातत्याने आग्रही काम करत राहिले. भौतिक विकास प्रगत तंत्रज्ञानाच्या जोडीला संवेदनशील जाणीव ठेवून माणसे जपणे ही कोल्हे साहेब यांची कार्यपद्धती होती.
या प्रसंगी सरपंच विजय दादा काळे,
शाम संवत्सरकर, कैलास संवत्सरकर ,भिमा संवत्सरकर ,बाळासाहेब संवत्सरकर ,यादवराव संवत्सरकर ,मच्छिंद्र लोणारी,राजेंद्र लोणारी,संजय तुळसकर ,वारकर भाऊसाहेब,मनोज इंगळे ,नंदु शुक्ला ,राहुल सुपेकर ,शिवा सुपेकर ,बाबासाहेब वराट,गणेश एखंडे ,शिवा सुपेकर ,विजयराव जाधव,मंगेश गायकवाड,सतिष निकम ,नाना निकम,अवि संवत्सरकर ,प्रसाद आढाव,विशाल शिदे,अमित रजपुत,बाळु एखंडे,अरूण सुपेकर,गणेश राऊत,अशोक वराट आदिंसह कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते
