
कोपरगाव प्रतिनिधी:-
कोपरगाव येथे तहसीलदार या पदावर काम करून गेलेले किशोर कदम यांची अहमदनगर जिल्ह्याचे सहाय्यक जिल्हा पुरवठा अधिकारी पदी नियुक्ती झाली असून त्यांनी आपल्या पदाचा पदभार नुकताच अहमदनगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले व निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचित यांची भेट घेऊन तसेच जिल्हा पुरवठा अधिकारी जयश्री माळी यांच्या उपस्थितीत सहाय्यक जिल्हा पुरवठा अधिकारी पदाचा कार्यभार स्वीकारला असून सदरची जागा बऱ्याच दिवसापासून रिक्त होती त्या जागेवर प्रभारी म्हणून पुरवठा निरीक्षक विजय उमाप यांच्याकडे देण्यात आली होती मात्र डिसेंबर अखेरीस उमप सेवानिवृत्त झाल्याने त्या जागेवर निवडणूक शाखेचे तहसीलदार चंद्रशेखर शितोळे यांच्याकडे सहाय्यक पुरवठा अधिकारी पदाची अतिरिक्त जबाबदारी देण्यात आली होती तहसीलदार किशोर कदम यांनी यापूर्वी अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव व श्रीरामपूर येथे तहसीलदार म्हणून त्यांनी काम केले असून त्यांना अहमदनगर जिल्ह्याची माहिती असून मात्र शासनाच्या आदेशाप्रमाणे त्यांची धुळे येथे तहसीलदार पदावर नियुक्ती होऊन ते बदलीच्या जागी हजर झाले होते मात्र आत्ताच त्यांना पुन्हा शासनाच्या अध्यादेशानुसार अहमदनगर जिल्हा सहाय्यक पुरवठा अधिकारी पदावर नियुक्ती मिळाली असून त्यांनी या पदाचा कार्यभार साभांळला असुन कामाला सुरुवात केली आहे.
