

कोपरगाव प्रतिनिधी:-
मा.शिवसेना पक्षप्रमुख उध्दवसाहेब बाळासाहेब ठाकरे . युवासेना प्रमुख युवासम्राट अदित्यसाहेब ठाकरे यांचे कट्टर निष्ठावंत शिवसैनिक पुणतांबा शहरप्रमुख महेश कुलकर्णी यांचे पुणतांबा येथील निवास्तानी आज कोपरगाव शहर शिवसेनेचे कट्टर शिवसैनिक माजी शहरप्रमुख व कामगार एसटी सेनेचे शहरप्रमुख धडाडीचे शिवसेना नेते भरतभाऊ मोरे पुरस्कृत मराठी सिनेमा मसुटा याचे प्रदर्शन संपुर्ण महाराष्ट्रात व देशात दि 3/3/2023 रोजी होत आहे. त्या निमित्ताने आज पुणतांबा शिवसेना शहरप्रमुख महेश कुलकर्णी यांचे चिरजींव जन्मजात वंदनीय दैवत बाळासाहेब ठाकरे यांचे निस्मिम भक्त कट्टर निष्ठावंत बालशिवसैनिक चि उत्कर्ष महेश कुलकर्णी .यांचे हस्ते आज मसुटा या चित्रपटातील हळदी गिता सह प्रदर्शन होत आहे.


संपुर्ण महाराष्ट्रातील बालगोपाळ सह जेष्ठ नागरिकांना चि उत्कर्ष याने आव्हान केले आपण सर्व कुटूंबासह या मराठमोळ्या चित्रपटाचा आपन लाभ घ्यावा.तसेच राहाता तालुका महिला आघाडी शिवसेनेच्या वतीने मसुटा या चित्रपटातील हळदी गिताचे कौतुक सौ चित्रा महेश कुलकर्णी यांनी करून .दिग्दर्शक अजित देवळे यांच्या सह सर्व मसुटा टिमच्या यशा साठी निर्माता व लेखक भरतभाऊ मोरे यांचे औंक्षण करून त्यांना या चित्रपटासाठी यश लाभावे म्हणून प्रभु अशोकबाबा महाराज व दैवत बाळासाहेब ठाकरे यांच्या चरणी प्रार्थना केली. बंधु भरतभाऊ मोरे यांचे माध्यमातुन कोपरगाव व राहाता तालुक्यातील ग्रामीण भागातील युवक व युवती. बालकलाकर यांच्या साठी मुख्य व्यासपीठ उपलब्ध होईल. मसुटा चित्रपटातील हळदी गिताचे आजच अक्षरश वेड लागले आहे असे सांगुन मसुटा चित्रपटासाठी बहीणीच्या नात्याने भरभरून शुभेच्छा दिल्या .पुणतांबा उपशहरप्रमुख नवनाथ वायकर यांनी सांगितले की मसुटा चित्रपट आॅस्कर पदा पयॅत जावा अशी आमची इच्छा व प्रार्थना आहे. शहरप्रमुख महेश कुलकर्णी यांनी मसुटा चित्रपटाचे लेखक व निर्माता भरत भाऊ मोरे व त्यांचे सहकारी यांचा सत्कार करून मसुटा चित्रपटासाठी भरभरून शुभेच्छा देऊन. येणार्या भविष्य काळात भरतभाऊ यांनी आपले चाणक्य नजरेने ग्रामीण भागातील होतकरू कलाकारांना व्यासपीठ उपलब्ध करून द्यावे असे सांगुन मसुटा यशस्वी व्हावा अशी ईच्छा प्रगट केली. याप्रसंगी पुणतांबा शिवसेनेचे बुथप्रमुख अप्पासाहेब बनकर. युवासेना सागर बोर्डे. अण्णाभाऊ साठे मित्र मंडळाचे युवानेते संतोष थोरात. अविनाश पिंगळे. शाखाप्रमुख राहुल इंगळे. इतर मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
