
कोपरगाव प्रतिनिधी:-
विषय डायव्हर्ट करण्यासाठी बेछूट आरोप चालू आहेत. आम्ही जी मालमत्ता घेतो ती कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून घेतो.सरकारची प्रॉपर्टी घेत नाही. महाराजांच्या नावावर ड्रॉ काढून घेत नाही .नगराध्यक्ष यांनी खरेदी-विक्री व्यवसायात यावे त्यांचे स्वागत आहे .सन २०१४च्या विधानसभा निवडणुकीचा हिशोब सांगितला तर तुम्हाला शहरात फिरणे मुश्कील होईल ,हिशोबाचे सर्व पुरावे आमच्या कडे आहेत .आंबेडकर स्मारकवर या सर्व दाखवू असे आवाहन अमृत संजीवणीचे चेअरमन पराग संधान यांनी नगराध्यक्ष वहाडणे यांना पत्रकार परिषदेत केले आहे.

काही दिवसांपूर्वी नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी एक पत्रकार परिषद घेऊन कोल्हेगट व शिवसेना नगरसेवकाच्या भ्रष्टाचाराचा खुलासा केला होता.
यावेळी बोलताना उपनगराध्यक्ष स्वप्नील निखाडे म्हणाले की,माझ्यावर पाणी पुरवठ्याचे पैसे खाल्ल्याचे आरोप केले आहे ते खोटे आहेत.मिटिंग मध्ये ४२कोटी रु च्या पाणी पुरवठा योजनेचा विषय घ्यावा म्हणून मी अनेक वेळा पत्र दिले, उलट ठेकेदाराला पाठीशी घालण्याचे काम वहाडणे यांनीच केले.मी विरोध करतो म्हणून मला बदनाम करण्याचे काम सुरू आहे. काहीही केले तरी मी शांत बसणार नाही. कधी नव्हे एव्हढी राजकारणाची पातळी खाली गेली आहे. आपली जागा विधानसभा निवडणुकीत जनतेने दाखवून दिली आहे. सर्व कामांचा मलिदा गेल्याने बेछूट आरोप सुरू आहेत.
नगरसेवक बागुल यांनीही नगराध्यक्ष वहाडणे यांच्यावर हल्ला चढवला. भ्रष्टाचाराचा वास येत असल्याने आम्ही सर्व विषय नामंजूर केले.भ्रष्टाचाराला विरोध करणारच ,त्यांचे मानसिक संतुलन बिघडले आहे.
आमचे संस्कार काढराण्यांनी आपले संस्कार कोणते आहे ते सांगावे .विकास कामांना विरोध नाही मात्र कामात गफलत असेल तर बहुमताचा हिसका दाखवणार.
शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख कैलास जाधव यांनी मी कोणतेही अतिक्रमण केलेले नाही,ती जागा संघटनेकडून विकत घेतली आहे असे स्पष्ट केले.
माजी नगराध्यक्ष संजय सातभाई यावेळी म्हणाले की-कोपरगावच्या चारही पाणी पुरवठा योजना माझ्याच काळात झालेल्या आहेत,तुम्ही तुमच्या काळात काय केले ते सांगा.राहिलेले सहा महिने चांगले काढा अशी विनंती केली.
भाजपचे शहराध्यक्ष दत्ता काले म्हणाले की,येवला रोड येथे पन्नालाल गुजराती यांची जागा आहे, तिच्यावरील आरक्षण उठविण्यासाठी नगराध्यक्ष खोटे आरोप करीत आहेत.
आम्ही सर्व नगरसेवकांनी विजय कंष्ट्रक्शन ला पैसे देऊ नका असा ठराव करूनही नगराध्यक्षानी तीन कोटी रुपये दिले असे माजी उपनगराध्यक्ष विजय वाजे यांनी यावेळी सांगितले.नगरसेवकात भांडणे लावायचे थांबवावे आणि तुमच्या कोणत्याही गोष्टीला आम्ही भीक घालणार नाही ,लवकरच जनता तुम्हाला तुमची जागा दाखवील असे शेवटी आरोपांना उत्तर देताना म्हटले आहे.
सदर प्रसंगी उपनगराध्यक्ष स्वप्नील निखाडे,माजी नगराध्यक्ष संजय सातभाई, भाजपचे शहराध्यक्ष दत्ता काले, रवींद्र पाठक,विजयराव वाजे,कैलास जाधव,नयनकुमार वाणी, गटनेते योगेश बागुल ,शिवाजी खांडेकर, जनार्दन कदम,अल्ताफ कुरेशी ,भाजपचे पदाधिकारी, नगरसेवक आदी उपस्थित होते.
