कोपरगाव तालुका व इतर पोलीस स्टेशन हददीतील ट्रॅक्टर चोरी करणा-या आरोपींना पोलीसांनी केले शिताफीने जेरबंद, उपविभागीय पोलीस अधिकारी, शिर्डी यांचे पथक व कोपरगाव तालुका पोलीस स्टेशनची कामगिरी…

Uncategorized

कोपरगाव प्रतिनिधी:-
दिनांक 23/01/2023 ते 24/01/2023 दरम्यान कोपरगांव तालुका पोलीस ठाणे हददीतील करंजी शिवारातुन उत्तम रायभान चरमळ यांचे मालकीचा महिंद्रा कंपनीचा लाल रंगाचा ट्रॅक्टर राहते घरासमोरुन अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेला होता. त्याबाबत कोपरगांव तालुका पोलीस ठाणे गु.र.नं. 52/2023 भा.द.वि.क. 379 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. तसेच दिनांक 25/01/2023 रोजी कोपरगांव तालुका पोलीस ठाणे हद्दीतील कोळपेवाडी शिवारातुन महेंद्र दिपक कोळपे यांचे मालकीचा महिंद्रा कंपनीचा जिओ लाल रंगाचा ट्रॅक्टर राहते घरासमोरुन अज्ञात चोरटयांनी चोरुन नेला होता. त्याबाबत कोपरगांव तालुका पोलीस ठाणे गु.र.नं. 59/2023 भा.द.वि.क. 379 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
सदर गुन्हयाचा तपास सुरु असतांना श्री संजय सातव, उपविभागीय पोलीस अधिकारी शिर्डी विभाग, शिर्डी यांना गोपनीय बातमीदारामार्फत बातमी मिळाली की. मंगेश सुदाम वर्पे रा. कनोली, ता. संगमनेर, जि. अहमदनगर व त्यांचे साथीदारांनी गुन्हा केला असुन नमुदचे टॅक्टर हे फायनान्स कंपनीचे असुन कमी किमतीत मिळतील असे सांगुन शेतकऱ्यांची फसवणुक करुन इसम नामे मंगेश सुदाम वर्पे, रा. कनोली, ता. संगमनेर, जि. अहमदनगर व अतुल सखाराम घुले, रा. संगमनेर, ता. संगमनेर, जि. अहमदनगर हे विक्री करणार असलेबाबत माहिती मिळाली.. अशा बातमीच्या आधारे सुरेश आव्हाड स. पो. नि. कोपरगाव तालुका पो.स्टे. तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी शिर्डी विभाग शिर्डी येथील गुन्हे शोध पथकातील पोहेकॉ. इरफान शेख, पोना. अशोक शिंदे, पो.ना. कृष्णा कुल्हे यांना मा. एसडीपीओ सो यांनी सुचना दिल्या. नमुदचे पथकाने वरिष्ठांचे सुचनेप्रमाणे तपासकामी जाऊन नमुदचे इसमांबाबत माहिती प्राप्त करुन त्यांना ताब्यात घेतले. सदरचे इसमांकडे गुन्हयाबाबत विचारपूस केली असुन त्यांनी त्यांचे इतर साथीदारासह ट्रॅक्टर चोरी केलेबाबत तसेच ते शेतकऱ्यांना फायनन्स कंपनीचे असल्याचे सांगुन विक्री करणार असलेची कबुली दिली आहे. त्यांना कोपरगांव पोलीस ठाणे कडील गुन्हयात अटक करुन त्यांची पोलीस कस्टडी घेऊन त्यांची सखोल चौकशी केली तेव्हा त्यांचेकडुन खालील ट्रॅक्टर हस्तगत करण्यात आलेले आहेत. तसेच खालील पोलीस स्टेशनचे ट्रॅक्टर चोरीचे खालील गुन्हे उघड झालेले आहेत.
गुन्हा रजिस्टर नंबर,कोपरगाव तालुका पोलिस स्टेशन गु.र.न.52/2023 भादविक 379,2,50,000/- रु. किमतीचा एक महिंद्रा कंपनीचा 575 सरपंच ट्रॅक्टर लाल रंगाचा
2),पिपळगाव बसवंत पोलिस स्टेशन
नाशिक ग्रामीण गु.र.नं. 52/2023 भादविक 379 ,4,00,000/- रु. किमतीचा एक स्वराज कंपनीचा 724 ऑरचिड ट्रॅक्टर लाल रंगाचा.,
3)कोपरगाव तालुका पोलिस स्टेशन गु.र.न.52/2023 भादविक 379:-1,70,000/- रु. किमतीचा एक महिंद्रा कंपनीचा जिवो 245 डीआय ट्रॅक्टर लाल रंगाचा.
४)संगमनेर तालुका पो.स्टे. गुरनं. 33/2023 भादविक 379 :-4,00,000/- रु. किमतीचा एक जॉन डिअर कंपनीचा हिरवे रंगाचा ट्रॅक्टर.
एकुण 12,20,000/- रुपये
अशा प्रकारची कौतुकास्पद कामगिरी मा. पोलीस अधिक्षक, श्री. राकेश ओला सो, मा. अपर पोलीस अधिक्षक सो स्वाती भोर मँडम, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी सो श्री संजय सातव सो यांचे मार्गदर्शनाखाली कोपरगाव तालुका पोलीस ठाण्याचे श्री. दौलत जाधव पोलीस निरीक्षक श्री सुरेश आव्हाड सहाय्यक पोलीस निरीक्षक, उपविभागीय पोलीस अधिकारी यांचे तपास पथकातील पोहेकॉ इरफान शेख, पो.ना. अशोक शिंदे, पो.ना. कृष्णा कुच्हे, सायबर पोलीस स्टेशन येथील पोना/फुरखान शेख, प्रमोद जाधव, तसेच कोपरगांव तालुका पो.स्टे. तपासी अंमलदार पोहेकॉ निजाम शेख, पो.ना. कोकाटे यांनी केली आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *