कोपरगांव तालुका क्रिकेट असोसिएशन व मुंबादेवी तरुण मंडळाच्या वतीने सरसेनापती चषक बाळासाहेब ठाकरे टेनिस बॉल क्रिकेटच्या स्पर्धेत चांदेकसारे येथिल वक्रतुंड संघ विजयी…

Uncategorized

कोपरगाव प्रतिनिधी:-
कोपरगांव तालुका क्रिकेट असोसिएशन व मुंबादेवी तरुण मंडळाच्या वतीने सरसेनापती चषक बाळासाहेब ठाकरे टेनिस बॉल क्रिकेटच्या स्पर्धेत चांदेकसारे येथिल वक्रतुंड संघ विजयी*
शिवसेना प्रमुख बा ळासाहेबांचे ठाकरे यांचे जयंती निमिताने दरवर्षी प्रमाणे या वर्षी देखिल सरसेनापती चषक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.
होते.या वेळी या टेनिसबॉल स्पर्धा लीग पद्धतीने खेळल्या गेल्या.स्पर्धेत १५ संघानी भाग घेतला.
या स्पर्धाचे पारितोषिक वितरण नुतन लोकनियुक्त नगराध्यक्ष श्री. पराग संधान यांच्या हस्ते करण्यात आले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी जेष्ठ नागरीक मंचच्या अध्यक्षा सौ. सुधाभाभी ठोळे हया उपस्थित होत्या.
या वेळी खेळाडुना मार्गदर्शन करताना श्री.पराग संधान म्हणाले की कोपरगांवच्या क्रिकेटला चालना देण्यासाठी जे सहकार्य असोसिएशन ला लागेल ते सर्व करु.या स्पर्धा सातत्याने कोपरगाव मध्ये गेल्या ३० वर्षा पासुन आयोजित केल्या जातात या बद्दल आयोजकांचे त्यांनी कौतुक केले. या कार्यक्रमाचे सुत्र संचालन असोसिएशनचे सचिव मनोज कपोते यांनी केले. या कार्यक्रमांचे प्रास्ताविक अध्यक्ष श्री.मकरंद को-हाळकर यांनी केले. शेवटी आभार असोसिएशनचे खजिनदार राजेंद्र होन यांनी मानले.
या वेळी जेष्ठ नागरीक मंचचे विजयभाऊ बंब, संजय को-हाळकर,कोपरगावचे उपनगराध्यक्ष जितेंद्र रणशुर,माजी नगरसेवक सुनिल शिलेदार, शिवसेना संपर्क प्रमुख प्रविण शिंदे,नगरसेवक प्रकाश रुईकर, माजी क्रीकेट खेळाडु जालिंदर मुरकुटे, प्रमोद बोधले, राजेंद्र लहीरे,नगरसेवक कालु आप्पा आव्हाड, आकाश वाजे, संजय जळगांव कर(उदावंत), कैलास मंजुळ, रविंद्र कथले, मुंबादेवी तरुण मंडळाचे संजय चव्हाण,
असोसिएशन चे उपाध्यक्ष प्रसिध्द बांधकाम व्यावसायिक प्रसाद नाईक,शिवसेना शहर प्रमुख बालाजी गोर्डे,मुंबादेवी तरुण मंडळाचे अध्यक्ष सुनिल फंड,
आदी मान्यवर उपस्थित होते. या स्पर्धा यशस्वी होण्यासाठी ओम मनोज कपोते,गोपाळ वैरागळ, समर्थ दिक्षित, पृथ्वी खंडागळे यानी इ. विशेष परीश्रम घेतले.
पंच म्हणुन खजिनदार राजेंद्र होन,सदस्य रीजवान पठाण, पवन शिंदे, तुषार विद्धस, ठाकुर,दर्शन लाहोटी यांनी तर गुणलेखक म्हणुन समर्थ दिक्षित व शेखर जाधव यांनी कामगिरी पाहीली. समालोचक म्हणून मनोज कपोते, शरद होन यांनी काम पाहीले.
या स्पर्धेत वक्रतुंड इलेव्हन कोपरगाव व्दीतीय तर फ्रेंड्स इलेव्हन कोपरगाव तृतीय व संवत्सर क्रिकेट संघाने चतृर्थ स्थान पटकावले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *