
कोपरगाव प्रतिनिधी:-
सोमवार दि.१३ फेब्रुवारी २०२३ रोजी श्री गजानन महाराज प्रकट दिनाचे औचित्य साधून शिर्डी येथे भव्य-दिव्य राज्यस्तरीय वधू-वर-पालक परिचय मेळावा साईबाबांच्या पवित्र पावन भूमीत मोठ्या थाटामाटात पार पडला. या भव्य राज्यस्तरीय वधू-वर मेळाव्याचे उद्घाटन व अतिथी अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या शुभहस्ते दिप प्रज्वलनाने झाले. यावेळी नाभिक समाजाच्या विनंतीला मान देऊन शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय खासदार सदाशिव लोखंडे साहेब देखील उपस्थित होते. यावेळी शिवसेना संपर्क प्रमुख बाळासाहेब पवार, माजी नगराध्यक्ष कैलास बापू सदाफळ, धनंजय गाडेकर, नितीनराव कापसे, CEO काकासाहेब डोईफोडे, नरेंद्र पाटील, प्रमोद सस्कर, राष्ट्रीय नाभिक एकता महासंघ अध्यक्ष भगवानराव बिडवे, प्रदेश कार्याध्यक्ष किरणभाऊ बिडवे, सुभाषमामा बिडवई, संजयभाऊ वाघ, राजूर येथील गौरामजी बिडवे, पत्रकार विलास तुपे, राहाता नगरसेविका अनुराधाताई तुपे, तालुकाध्यक्ष दिलीपराव जाधव, संजयभाऊ जगताप, जयश्रीताई बिडवे, सुनिल विश्वासराव, भाऊसाहेब बिडवे, कल्याणराव राऊत, राष्ट्रीय जनसेवा पक्षाचे संजय पंडित साहेब, राजू गायकवाड, प्रवीण कार्ले, प्रदेशाध्यक्ष ज्ञानेश्वर चातुर आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.


साईबाबांचा मूलमंत्र घेऊन राष्ट्रीय नाभिक एकता महासंघाचे जिल्हाध्यक्ष साईभक्त माननीय श्री मनोजभाऊ वाघ यांनी आज साईबाबाच्या पवित्र पावन भूमीत नाभिक समाजाचा राज्यस्तरीय वधू-वर परिचय पालक मेळावा आयोजित करून आपल्या समाजाच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी अतिशय उत्कृष्ट असे नियोजन करण्यात आले होते. राज्यस्तरीय मेळाव्यात वधू-वरांना जास्तीत जास्त प्राधान्य दिले गेले. त्यांच्या या सामाजिक कार्याची दखल समाज बांधवांनी घेऊन मनोज भाऊंचे कौतुक केले जात आहे.


या वधू-वर-पालक परिचय मेळावा यशस्वीरीत्या संपन्न होण्यासाठी विशेष सहकार्य सन्माननीय दशरथ तुपे, तालुकाध्यक्ष अशोकमामा कोरडे, जिल्हाध्यक्ष किरण बिडवे, जिल्हाध्यक्ष रमेशभाऊ बिडवे, आनंद बिडवे, सुधाकर गायकवाड, राजू बिडवे, संजय सोनवणे, गणेश कडवे, कार्यक्रमाचे समालोचक ऍड.सुनिलभाऊ कोरडे, पत्रकार श्री एकनाथ शिंदे, रमेश चौधरी, बाळासाहेब मदने, सचिन शिंदे, ज्ञानेश्वर कोल्हाळ, नाभिक महामंडळाचे बाळासाहेब भुजबळ, संभाजीनगर येथील जेष्ठ पत्रकार दादासाहेब काळे, एकनाथ कडवे, किशोर बिडवे सर, विठ्ठल कडूसकर सर, अमोल बिडवे, संगमनेर येथील समाज भूषण विठ्ठल खंडागळे, बाळासाहेब वाघ, बाबा बिडे, किरण मदने, अनिल बिडे, अमोल कोल्हाळ, महेश भराडे, केशव कोल्हाळ सर, नाशिक येथील संतोषभाऊ वाघ, सामाजिक कार्यकर्ते म्हाळूशेठ चौधरी, अनिकेत तुपे, रविंद्र भराडे, संजय जाधव, प्रवीण कुटे, महादेव कदम, पांडुरंग तुपे, सुनिल गायकवाड, संजय जाईबहार, माऊली गायकवाड, रमेश कोल्हाळ सर, दिपक सोनवणे, सोमनाथ कोरडे, प्रवीण तुपे, रमेश वाघ सर, येवला येथील सचिन सोनवणे, गजानन राऊत, पत्रकार अनिल वाकचौरे, पत्रकार संतोष जाधव, शेखरकाका भोर, गोपिनाथ बिडवे, गणेश बिडवे, TV कलाकार रवी वाघ आदींसह समाजातील राजकीय, शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील प्रमुख पाहुणे, मान्यवर यावेळी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी वधू-वर मेळाव्याचे आयोजक व राष्ट्रीय नाभिक एकता महासंघाचे जिल्हाध्यक्ष साईभक्त मनोजभाऊ वाघ यांनी सर्वांचे आभार मानून सांगता केली.
