
कोपरगाव प्रतिनिधी
(नाशिक ):- केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला असून यामध्ये रस्ते विकास व वाहतूक सुलभ होण्यासाठी ७५ हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे वाहतूक क्षेत्राला मोठा दिलासा मिळाला आहे, अशी प्रतिक्रिया नाशिक जिल्हा ट्रान्सपोर्ट असोसिएशनचे अध्यक्ष राजेंद्र फड यांनी व्यक्त केली आहे.
राजेंद्र फड यांनी म्हटले आहे की, पायाभूत सुविधांना अधिक चालना दिल्याने वाहतूक क्षेत्राला अधिक फायदा होणार आहे. तसेच इलेक्ट्रॉनिक वाहनांच्या करात सवलत देण्याचा निर्णय स्वागतार्ह आहे. मात्र अर्थसंकल्पात पेट्रोल, डीझेल व सीएनजीच्या दराबाबत कुठल्या उपाययोजना करण्यात आल्या आहे याबाबत स्पष्टता नसल्याने वाहतूकदारांमध्ये संभ्रम असल्याची प्रतिक्रिया राजेंद्र फड यांनी दिली आहे.
