
कोपरगाव प्रतिनिधी:-
क्रीडा व सांस्कृतिक क्षेत्रात कार्य करणारे कार्यकर्ते हे महत्त्वाचे घटक असून त्यांचा तळमळीने सहभाग हा त्या कार्याला एका उंचीवर नेत असतो.कार्यकर्तेच क्रीडा व सांस्कृतिक वैभव टिकवण्यासाठी झटत असतात.असे प्रतिपादन महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन प्रशासकीय समितीचे सदस्य जयंत येलूलकर यांनी केले.
वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त आणि माजी नगरसेवक व क्रीकेटपटू स्व.दिपक(अण्णा) माळी यांच्या स्मरणार्थ मुंबादेवी तरुण मंडळ आणि कोपरगाव तालुका क्रिकेट असोसिएशन यांचे संयुक्त विद्यमाने सरसेनापती चषक खुल्या क्रिकेट स्पर्धा २०२३ शुभारंभ कोपरगावातील जय लक्ष्मी स्टेडियम, बाजारतळ येथे करण्यात आले. या प्रसंगी प्रमुख उद्घाटन समारंभास प्रमुख अतिथी म्हणून महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन प्रशासकीय समितीचे सदस्य जयंत येलूलकर उपस्थित होते.

कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ नागरिक उद्धवराव विसपुते,विजय बंब,संजय को-हाळकर, उत्तमभाई शहा, ठोळे उद्योग समुहाचे संचालक राजेश ठोळे, सूर्यतेज संस्थापक व स्वच्छतादूत वनश्री सुशांत घोडके, शिवसेना संपर्कप्रमुख प्रविण शिंदे,शिवसेनेचे बाळासाहेब जाधव,मनसेचे उपजिल्हाध्यक्ष संतोष गंगवाल,माजी नगरसेवक रमेश वाघ,शिवनारायण परदेशी, सोपानराव वायखिंडे, भन्साळी,संत ज्ञानेश्वर स्कूलचे संचालक विशाल झावरे,प्रगत शिवाजी रोडचे विकास आढाव,मैत्र फाऊंडेशनचे वैभव आढाव, कोपरगाव तालुका क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष मकरंद को-हाळकर,पंच कमिटीचे अध्यक्ष राजेंद्र कोयटे, राजेंद्र माळी,संत सेनाचे नेते सोमनाथ व्यवहारे,नाट्यपरिषदेचे लोककलावंत रमेश टोरपे, बहुजन वंचितचे शरद खरात,सौ.राखीताई विसपुते,सौ.कावेरीताई कपोते आदि मान्यवर उपस्थित होते.
२० वर्षांपूर्वी जयंत येलूलकर हे अहमदनगर जिल्हा क्रिकेट असोसिएशन सरचिटणीस असतांना ग्रामीण भागातील क्रिकेट खेळाडूंना हक्काचे ठिकाण मिळावे म्हणून जिल्हा अंतर्गत तालुकास्तरीय क्रिकेट असोसिएशनची स्थापना केली.या माध्यमातून आंतरतालुका अंतर्गत क्रिकेट स्पर्धा आयोजित करुन ग्रामीण भागातील क्रिकेट खेळाडूंच्या गुणवत्तेला वाव देण्यात आला. महाराष्ट्रात प्रथमच कोपरगाव तालुक्यात क्रिकेट असोसिएशन ही संकल्पना पुढे आणली. या माध्यमातून अनेक नवोदित क्रीकेट खेळाडूंना आपले क्रीकेट कौशल्य दाखविता आले आहे.
याप्रसंगी श्री.येलूलकर पुढे म्हणाले, कुठल्याही गावात कला, क्रीडा, सांस्कृतिक उपक्रम निरंतर सुरू असणे म्हणजे त्या गावाचे गावपण जिवंत असल्याचे लक्षण आहे.असे सांगत ग्रामीण भागातील क्रिकेटसाठी जे-जे काही करता येईल ते-ते करण्यासाठी प्रयत्नशील राहू.असे आश्वस्त केले.
सरसेनापती क्रिकेट स्पर्धा करिता प्रथम पारितोषिक २१ हजार रुपये व चषक, व्दितीय पारितोषिक ११ हजार रुपये व चषक, तृतीय पारितोषिक ७ हजार रुपये व चषक,चतुर्थ पारितोषिक ५ हजार रुपये व चषक या सह विविध पारितोषिके ठेवण्यात आली आहे.तर स्पर्धेस ठोळे उद्योग समुह, डॉ.राजेश माळी,माजी नगरसेवक कालुआप्पा आव्हाड, कैलास मंजुळ,मालाताई धोंगडी,संजय जळगावकर,सी.के.७ बेकरी,कोठारी इलेक्ट्रीकल्स, साईनाथ टेलीकाॅम यांचे सहकार्य लाभले आहे.

कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी आयोजन समितीचे प्रमुख मनोज कपोते, राजेंद्र (पिटर) होन,संतोष चव्हाण,पवन शिंदे,रिजवान पठाण, सुनील खैरे,संदिप दळवी, सुनील मोरे,अरविंद मंडलिक,विजय उदावंत, निलेश गंगवाल,मनोज विसपुते,संतोष देवळालीकर,संजय ठाकूर यांचेसह क्रिकेट प्रेमी प्रयत्नशील आहे.सामन्याचे धावते समालोचन शरद होन करत आहे.
उपस्थितांचे स्वागत मुंबादेवी तरुण मंडळाचे अध्यक्ष सुनील फंड यांनी केले.तर सुत्रसंचलन ज्ञानेश कपिले व तुषार विध्वंस यांनी केले.दि.१८ जानेवारी ते २२ जानेवारी २०२३ दरम्यान होणा-या क्रिकेट सामन्यात सुमारे २४ संघांनी सहभाग नोंदविला असून जय लक्ष्मी स्टेडियमवर क्रिकेट प्रेमींची रंगतदार सामने पहाण्यासाठी गर्दी होत आहे.
