
कोपरगाव प्रतिनिधी:-
असेल अत्यंत गरजेचे
तरच घराबाहेर पडा
विनाकारण हिंडणाऱ्याना
कोरोनाच शिकविल धडा
शासकिय आदेश पाळा
अन्यथा भरेल पापांचा घडा
कोविड विषाणू शिरला तर
एकटेच कोपऱ्यात बसून रडा
कोविड विषाणू जाणत नाही
कोण छोटा अन कोण बडा
औषधे आणायची असतील
तरच एकजण घराबाहेर पडा
नसेल डोके ठिकाणावर तर
गर्दित एकमेकांच्या बोकांडी चढा
गलथान बेपर्वा लोकांमुळेच
सर्वांच्या विश्वासाला जातो तडा
नियमित स्वच्छता सॅनिटायझर
एकमेकांत सुरक्षित ठेवा अंतर
आज सुरक्षित राहिलो तरच
भेटता येईलच कधीही नंतर
मास्क अन रुमालाचा
न चुकता करावा वापर
केलाच घात कोविडने तर
शासनावर फोडू नये खापर
विवाह सोहळे अंत्यविधी
नकोच पुढाऱ्यांच्या सभा
प्रत्येकानेच सावध रहावे
कोरोना धरून बसलाय दबा
झालीच कोरोनाची लागण तर
काय कामाचा तुमचा दबदाबा
फुकाचा रूबाब नको अन्यथा
रोज घ्याव्या लागतील शोकसभा
दंड अन दांड्याचा वापर
करायलाच हवा शासनाने
गलथान लोक सुधारत नाहीत
केवळ प्रबोधन अन भाषणाने….
विजय वहाडणे
