मराठी पत्रकार परिषदेच्या कोकण विभागीय, सचिवपदी पनवेलचे अनिल भोळे यांची नियुक्ती…

Uncategorized

कोपरगाव प्रतिनिधी
(मुंबई):- मराठी पत्रकार परिषदेच्या कोकण विभागीय सचिवपदी पनवेल येथील दैनिक ‘रसायनी टाइम्सचे’ संपादक अनिल भोळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.. जे. डी. पराडकर यांनी राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या पदावर आता अनिल भोळे विभागीय सचिव म्हणून काम पाहतील.. परिषदेचे अध्यक्ष शरद पाबळे यांनी आज ही घोषणा केली.. रत्नागिरी, रायगड, नवी मुंबई, ठाणे आणि पालघरची जबाबदारी अनिल भोळे यांच्यावर सोपविण्यात आली आहे.. अनिल भोळे यापुर्वी परिषदेशी संलग्न रायगड प्रेस क्लबचे अध्यक्ष होते.. मुख्य विश्वस्त एस.एम.देशमुख, विश्वस्त किरण नाईक, कार्याध्यक्ष मिलिंद अष्टीवकर, सरचिटणीस मन्सूरभाई शेख यांनी त्यांच्या निवडीबद्दल त्यांचे अभिनंदन केले आहे.. अनिल भोळे यांच्या निवडीचे कोकण परिसरात सर्वत्र स्वागत होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *