प्रकाश जोशी यांचे निधन…

Uncategorized

कोपरगांव प्रतिनिधी:-
वकृत्व कलेत निपुण असलेले प्रकाश दत्तात्रय जोशी ऊर्फ गुरू (७४) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुले दोन मुली, सुना नातवंडे असा परिवार आहे. सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांचे विश्वासू सहकारी म्हणून ते परिचित होते.त्यांच्या पार्थीवावर देवगांव येथे अंत्यसंस्कार करण्यांत आले. संजीवनी सैनिकी भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्राचे संचालक म्हणूनही त्यांनी काम पाहिले होते. त्यांच्या निधनाबददल संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे, भाजपाच्या प्रदेश सचिव सौ स्नेहलताताई कोल्हे, संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टीटयूटचे कार्यकारी विश्वस्थ अमितदादा कोल्हे, जिल्हा बँकेचे संचालक विवेकभैय्या कोल्हे आदींनी शोक व्यक्त केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *