
कोपरगाव प्रतिनिधी:-
मनमाड ते नगर दुहेरी रेल्वे मार्गाचे बरेच काम पूर्ण झाले आहे सणासुदीचे दिवस व गर्दी लक्षात घेता या रेल्वे मार्गावर लोकल रेल्वे सेवा सुरू करावी अशी मागणी लोक स्वराज्य आंदोलनाचे प्रदेश अध्यक्ष अँड.नितीन पोळ यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे
आपल्या पत्रकात पुढे म्हणाले की
कोपरगाव अहमदनगर महा मार्गावर मोठमोठे खड्डे झाले आहेत त्यामुळे या मार्गावर गाडी चालवणे जिकिरीचे झाले आहे त्यावर मागील तीन चार महिन्यात अपघातात पन्नास पेक्षा जास्त नागरिकांचा मृत्यू झाला त्याच प्रमाणे अनेकांना कायमचे अपंगत्व आले या महामार्गावर खड्डे झाल्यामुळे नागरिक व प्रवाशांमध्ये असंतोष निर्माण झाला सद्या दुरुस्ती साठी हा मार्ग बंद ठेवण्याचा निर्णय झाला आहे मात्र सद्या सणासुदीचे दिवस असून लेकिसूनाना माहेर वासीन म्हणून प्रवास करावा लागणार आहे त्यात हा रस्ता बंद केल्यामुळे अनेकांची अडचण होणार आहे
सद्या दिवाळीचा सिझन म्हणून रेल्वे ने व एस टि महामंडळाने जादा गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे असे असले तरी लांब पल्ल्याच्या रेल्वेमध्ये दोन चार जनरल डब्याची सुविधा असते मात्र सद्या तरी या मार्गावरील काही साध्या रेल्वे बंद आहेत
सद्या मनमाड दौंड दुहेरी व विद्युत रेल्वे मार्गाचे बरेच काम पूर्ण झाले आहे त्यामुळे या मार्गावर मनमाड नगर अशी लोकल रेल्वे सुरू झाली व दिवसातून चार पाच लोकल रेल्वे फेऱ्या सुरू केल्या तर प्रवाशांना मोठा दिलासा मिळू शकतो असे या पत्रकात म्हटले आहे
