
कोपरगाव प्रतिनिधी:-
सोमवार दिनांक १९ सप्टेंबर २०२२ रोजी शिवसेना पक्षप्रमुख सन्माननीय श्री उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली व मा.शिवसेना नेते श्री विनायकजी राऊत साहेब, शिवसेना नेते मा.श्री अरविंदजी सावंत साहेब, शिवसेना उपनेते मा.श्री रविंद्रजी मिर्लेकर साहेब, माजी समाजकल्याण मंत्री तथा शिवसेना उपनेते मा.श्री बबनरावजी घोलप यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रीय नाभिक एकता महासंघाच्या राज्यस्तरीय पदाधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाची बैठक मुंबई मातोश्री बंगल्यावर नाभिक एकता महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष मा.श्री.भगवानराव बिडवे यांच्या पुढाकाराने संपन्न झाली.


सदर २ तास चाललेल्या बैठकी दरम्यान काम करणाऱ्या पदाधिकार्यांना मोठी जबाबदारी देण्याचे आदेश मा.श्री उद्धव ठाकरे साहेबांनी नेत्यांना दिले आहेत. या बैठकीत सामाजिक प्रश्न तसेच समस्या व सध्याची राजकीय, सामाजिक स्थिती याबाबत चर्चा झाली असुन शिवसेना प्रवेशा बाबत महाराष्ट्रातील पदाधिकारी यांच्या समवेत चर्चा करून तसेच शिवसेनेच्या मान्यवर पदाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली योग्य ती वेळ निश्चित करून लवकरच निर्णय घेण्यात येणार आहे. या बैठकीस उपस्थित राज्य पदाधिकारी प्रदेश कार्याध्यक्ष श्री किरणभाऊ बिडवे, श्री संजयभाऊ वाघ, श्री सुभाषमामा बिडवई, श्री रमेशभाऊ बिडवे यांच्यासह तालुका व जिल्हा स्तरावरील सर्व पदाधिकारी तसेच समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
