राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष मा.खा.शरद पवार यांनी “रयत शिक्षण संस्था, सातारा” या संस्थेच्या ‘जनरल बॉडी सदस्य’ पदी संदीप वर्पे यांची निवड झाल्याबद्दल केले अभिनंदन…

Uncategorized

कोपरगाव प्रतिनिधी :- शैक्षणिक क्षेत्रात काम करणारी आशिया खंडातील सर्वात मोठी शिक्षण संस्था असलेल्या “रयत शिक्षण संस्था, सातारा” या संस्थेच्या ‘जनरल बॉडी सदस्य’ पदी निवड झाल्याबद्दल आदरणीय शरद पवार साहेब यांनी संदीप वर्पे यांना पत्राच्या माध्यमातून अभिनंदन करुन भावी वाटचालिस शुभेच्छा दिल्या आहे.
आदरणीय पवार साहेबांनी दिलेली जबाबदारी व टाकलेला विश्वास सार्थ ठरवण्याचा माझा प्रयत्न असणार आहे.
रयत शिक्षण संस्थेच्या ज्या महाविद्यालयात व संस्थेत माझ्या आईने प्राध्यापिका म्हणून नोकरी केली यापूर्वी त्याच महाविद्यालयाचा ‘विकास समिती सदस्य’ म्हणून व आज रयत शिक्षण संस्थेचा ‘जनरल बॉडी सदस्य’ म्हणून आदरणीय साहेबांनी मला संधी दिली. याबद्दल संदीप वर्पे यांनी पवार साहेबांचे आभार मानले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *