कोपरगाव प्रतिनिधी:-
स्थानिक के.जे.सोमैया वरिष्ठ व के.बी.रोहमारे कनिष्ठ महाविद्यालयाच्या विज्ञान शाखेची विद्यार्थिनी आदिती देशमुखने भाऊसाहेब ना.स.पाटील साहित्य व मु.फी.मु.अ. वाणिज्य महाविद्यालय धुळे, येथे झालेल्या आमदार कुणालबाबा पाटील राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत द्वितीय क्रमांकाचे रु. ७००१/- स्मृतीचिन्ह व प्रशस्तीपत्रक पटकावून महाविद्यालयाच्या नावलौकिकात मानाचा तुरा खोवला आहे, अशी माहिती प्राचार्य डॉ.बी.एस. यादव यांनी येथे दिली.
कु. आदिती देशमुख ही महाविद्यालयाची एक उत्कृष्ट वक्ता असून नियमित अभ्यासाबरोबरच आतापर्यंत तिने पद्मश्री विखे राज्यस्तरीय वादविवाद करंडक, अहमदनगरचा महावक्ता आदी अनेक चषक व पारितोषिके पटकावली आहेत. त्याचबरोबर ती वाङ्मय मंडळाच्या अंतर्गत होणाऱ्या काव्यलेखन व वाचन , निबंध लेखन आदी स्पर्धांमध्ये देखील सतत सहभाग घेऊन पारितोषिके पटकवली असल्याची माहिती महाविद्यालयाचे वादविवाद व वाङ्मय मंडळाचे प्रमुख डॉ. जिभाऊ मोरे यांनी दिली. कु. आदिती देशमुखच्या या यशाबद्दल को.ता.एज्यु. सोसायटीचे अध्यक्ष मा. अशोकराव रोहमारे, सचिव ऍड. संजीवदादा कुलकर्णी व विश्व्स्त मा. संदीप रोहमारे, प्राचार्य डॉ.बी.एस. यादव, डॉ. जिभाऊ मोरे, डॉ. गणेश देशमुख, रजिस्ट्रार डॉ. अभिजित नाईकवाडे तसेच सर्व प्राध्यापक व प्राध्यापकेतर कर्मचाऱ्यांनी यांनी अभिनंदन केले आहे.

फोटो ओळी:- कु. आदिती देशमुख मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक स्वीकारतांना.
