
कोपरगाव प्रतिनिधी :- कोपरगाव येथील मोहनीराजनगर भागातील अर्जुन तरुण मंडळाच्या वतिने गणेश उत्सव मोठ्या जल्लोषात साजरा होणार आहे. रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी प्रेणित अर्जुन तरुण मंडळाच्या वतिने भव्य गणेश उत्सव साजरा होणार असुन या निमित्ताने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. बुधवार दिनाक ३१ आँगस्ट रोजी सायं. ५ वा.श्रींची स्थापना केली जाणार आहे.गुरुवार दि १ सप्टेबर २०२२ रोजी सायं. ७ वा.होम मिनिस्टर (फक्त महिलांसाठी) बक्षिस आकर्षक पैठणी डान्स स्पर्धा (लहान मुलींसाठी) आयोजित करण्यात आली आहे.शुक्रवार दि२ सप्टेंबर २०२२ रोजी सायं. ७ वा.फुगडी व संगीत खुर्ची स्पर्धा ,(बक्षिस आकर्षक पैठणी )इंदोरीकर महाराज यांच्यावर आधारित एक पात्री नाटक कार्यक्रम ,शनिवार ३सप्टेंबर २०२२ रोजी सायं. ७ वा.ऑर्केस्ट्रा, मंडळातील सभासद व कोरोना महामारीत दिवंगत झालेल्या व्यक्तींच्या पत्नींचा सन्मान रविवार ४ सप्टेंबर २०२२ रोजी सायं. ७ वा.जाहिर हरि किर्तन,सोमवार ५ सप्टेंबर २०२२ रोजी सायं. ७ वा.मोहनीराजनगरमधील सर्व विधवा व प्रतिष्ठीत व्यक्तींचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला आहे.,मंगळवार ६ सप्टेंबर २०२२ रोजी सायं. ७ वा. महाप्रसाद कार्यक्रम होणार असुन भाविकांना याचा लाभ घ्यावा.बुधवार ७ सप्टेंबर २०२२ दुपारी ३ वा.श्रींची विसर्जन मिरवणूक होणार आहे अशी माहिती अर्जुन तरुण मंडळाचे संस्थापक राजेंद्र जोशी यांनी दिली आहे.
