कोपरगाव प्रतिनिधी:-
स्थानिक के. जे. सोमैया महाविद्यालयात स्टार्टअप अँड इनिवेशन सेल,अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष व राष्ट्रीय बौद्धिक संपदा अधिकार जागृती अभियान भारत सरकार विभागाच्या संयुक्त विद्यमाने दि. ९ मार्च रोजी “बौद्धिक संपदा अधिकार” या विषयावर एकदिवसीय राष्ट्रीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेत प्रमुख पाहुणे म्हणून मिस उज्वल व श्री. अमोल पाटील हे उपस्थित होते. मिस उज्वल यांनी ‘बौद्धिक संपदा अधिकार’ या विषयावर मार्गदर्शन करतांना बौद्धिक संपत्ती संरक्षणासाठी कायदेशीर बाबी लक्षात आणुन त्याचे पेटंट कसे तयार करण्यात येते याविषयी मार्गदर्शन केले. संपत्तीचे विविध प्रकार नमुद करतांना त्यांनी अमूर्त संपत्तीचे इतर संपत्तीप्रमाणे पेटंट, कॉपी राईट, इंडस्ट्रीयल डिझाईन, ट्रेड मार्क, भौगोलिक मानांकन (जीआय.टाग) या अनेक गोष्टीचांही यात समावेश होत असल्याचे सांगितले. श्री. अमोल पाटील यांनी आपल्या मनोगतात या कार्यशाळेचा उद्देश्य नमुद करतानांच उपस्थित सहभागी प्राध्यापक व विद्यार्थ्यांच्या शंकाचे विस्तृत विवेचन केले.
या कार्यशाळेसाठी उद्घाटक म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.एस.यादव यांनी उपस्थित राहून शुभ-संदेश दिला. कार्यशाळेच्या प्रास्ताविकात स्टार्टअप अँड इनिवेशन सेलचे समन्वयक डॉ.एस.जी.कोंडा यांनी स्टार्टअप अँड इनिवेशन सेलची कार्यपद्धती समजुन सांगतानाच महाविद्यालय स्तरावर या सेलच्या माध्यमातून राबविलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली. तर पाहुण्यांचा परिचय डॉ. एस.आर.पगारे यांनी करून दिला. कार्यशाळा यशस्वीतेसाठी प्रा.गुडघे, डॉ. गणेश चव्हाण व प्रबंधक डॉ. अभिजित नाईकवाडे यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यशाळेचे सूत्रसंचालन प्राध्यापिका वर्षा आहेर यांनी तर आभार प्रा. निलेश पोटे यांनी मानले. या कार्यशाळेसाठी आयोजक महाविद्यालय व अन्य महाविद्यालयातील ४६० च्या आसपास विद्यार्थी व प्राध्यापक उपस्थित होते. कार्यशाळेच्या यशस्वीसाठी संस्थेचे अध्यक्ष मा.अशोकराव रोहमारे, सचिव मा.संजिवदादा कुलकर्णी, विश्वस्त मा. संदिपराव रोहमारे, अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक प्रा. विजय ठाणगे यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या.

फोटो ओळ:-
बौद्धिक संपदा अधिकार’ या कार्यशाळेत मार्गदर्शन करतांना मिस उज्वल व उपस्थित मान्यवर
