कोपरगांव प्रतिनिधी:-
कोपरगांव शहराच्या खडकी या उपनगरामध्ये जिल्हा परीषदेची शाळा असुन तेथे सुमारे २२५ विध्यार्थी शिक्षण घेत अहेत. ते सर्व गरीब कुटूंबातील आहेत. काहींचे पालक शेतकरी आहेत तर काही मोलमजुरी करणारांची. अत्यंत खडतर परीस्थितीतुन शिक्षण घेवुन काहीतरी बनायचे, हे स्वप्न डोळ्यात साठवुन ही सर्व चिमुरडी बालक अभ्यासाचे धडे गिरवित आहेत. कधी पाटी नाही, कधी वही नाही तर कधी पेन्सिल आणि दप्तरही नाही. अशा परीस्थितीत रोटरी क्लब ऑफ कोपरगांव सेंट्रल पुढे आले आणि सर्व विध्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप केले आणि सर्व बालकांच्या चेहऱ्यावर हास्य फुलले.
रोटरी क्लब ऑफ कोपरगांव सेंट्रलच्या पुढाकाराने अनेक विधायक उपक्रम राबविले जातात. त्यामुळे अनेकांना मदतीचा हात मिळत आहे. रोटरी डिस्ट्रिक्ट ३१३२ चे गव्हर्नर श्री रूखमेश जखोटीया यांनी एक लाख वृक्ष लागवडीचा संकल्प केला आहे. त्यांच्या या संकल्पनेला हातभार लावण्यासाठी सदर प्रसंगी क्लबच्या वतीने वृक्ष लागवडही करण्यात आली.
सदर प्रसंगी रोटरी क्लबचे श्री विरेश अग्रवाल, राकेश काले, राहित वाघ, विशाल आढाव, विनोद मालकर, इमरान सय्यद, सनी अव्हाड तसेच मुख्याध्यापक श्री दत्तात्रय काळे, श्रीराम तांबे, आदी उपस्थित होते. संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे मॅनेजिंग ट्रस्टी श्री अमित कोल्हे, विश्वस्त श्री सुमित कोल्हे यांनी या उपक्रमाचे कौतुक केले.

फोटो ओळी: रोटरी क्लब ऑफ कोपरगांव सेंट्रलच्या वतीने जिल्हा परीषद शाळेतील विध्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले.
