
कोपरगाव प्रतिनिधी:-
सत्यशोधक अण्णा भाऊ साठे यांच्या १०२ व्या जयंती निमित्ताने लोक स्वराज्य आंदोलनाच्या वतीने
अण्णा भाऊ की दर्द भरी दास्तान या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती लोक स्वराज्य आंदोलनाचे प्रदेश अध्यक्ष अँड.नितीन पोळ यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे
आपल्या प्रसिद्धी पत्रकात पोळ पुढे म्हणाले की अण्णा भाऊ साठे यांनी आपल्या संपूर्ण आयुष्यात अनेक संघर्षमय प्रसंगांना सामोरे जावे लागले असून त्यांच्या या संघर्षमय जीवनाचे चित्रण जेष्ठ साहित्यिक पानिपत कार मा विश्वास पाटील यांनी आपल्या “अण्णा भाऊ की दर्द भरी दास्तान” या कादंबरीतून रेखाटले आहे लोक स्वराज्य आंदोलनाच्या वतीने वर्षभर महापुरुषांच्या विचारांचा जागर केला जातो.त्यामुळे या वर्षी लोक स्वराज्य आंदोलनाच्या वतीने मंगळवार दि १६ ऑगस्ट २०२२ रोजी सायं ५ वा समता बँकेच्या हॉल मध्ये या कार्यक्रमाचे आयोजन केले असून या कार्यक्रमास तालुक्यातील राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर तसेच तालुक्यातील प्रशासकीय अधिकारी शिक्षक प्राध्यापक उपस्थित राहणार आहे
यावेळी समाजातील जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते कै.वि.तू बागुल दलित मित्र पुरस्कार,कै.मच्छीन्द्र राक्षे यांच्या स्मरणार्थ फकीरा युवा कार्यकर्ता पुरस्कार तर कै प्रयोगाबाई त्रिभुवन यांच्या स्मरणार्थ मुक्ता साळवे शिक्षिका पुरस्कार देण्यात देण्यात येणार आहे
या कार्यक्रमासाठी
मा आ आशुतोष काळे,मा विवेक भैय्या कोल्हे, मा काका साहेब कोयटे, मा विजय राव वहाडने, राजेश आबा परजने पराग संधान मा तहसीलदार विजय बोरुडे साहेब पोलीस निरीक्षक मा वासुदेव देसले साहेब मा दौलतराव जाधव साहेब, गट विकास अधिकारी सूर्यवंशी साहेब,पत्रकार बांधव तसेच सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहे कार्यक्रम यशस्वीते साठी जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र बागुल,विनोद राक्षे, शरद त्रिभुवन, संजय शिर्डीकर, दिलीप तुपसुंदरसर, बलभीम उल्हारे किरण आढागंळे, सुजल चंदनशिव, प्रवीण शेलार, सोमनाथ म्हस्के, अनिल पगारे,संदीप निरभवने,अनिल मरसाळे, दिपक आरणे,भारत रोकडे, प्रवीण शेलार, राजू उमाप,अनिल जाधव,अर्जुन मरसाळे,मोनू म्हस्के, सोमनाथ अहिरे, किशन भालेराव, अशोक पवार, गोपीनाथ ताते, किरण सोळसे नाना बत्तीसे लक्ष्मण रोकडे जयवंत मरसाळे विनोद वाकळे आदी परिश्रम घेत आहेत
