
कोपरगाव प्रतिनिधी
(सुरेगाव):-
देशातील विविध कार्यकारी सोसायटी संस्थांचे रूपांतर बहुराज्यीय व बहुउद्देशीय संस्थांमध्ये करणारा कायदा भारत सरकार करणार असून या कायद्यामुळे देशातील सहकारी चळवळीला बळकटी मिळणार आहे. त्यामुळे संधीचा सदुपयोग करून घेण्यासाठी संस्थानी सज्ज व्हावे चासनळी भागात ५ पतसंस्था व ७ सेवा संस्था असल्याने चासनळी सहकाराची पंढरीच असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष ओमप्रकाश कोयटे यांनी केले.
कोपरगाव तालुक्यातील चासनळी येथील गोदावरी विकास प्रतिष्ठान व गोदावरी परिसर ग्रामीण बिगरशेती पतसंस्था यांच्या संयुक्त विद्यमाने सहकार परिषदेचे आयोजन गोदावरी संकुल येथील सभागृहात करण्यात आले याप्रसंगी महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन अध्यक्ष तथा समता पतसंस्थेचे अध्यक्ष ओमप्रकाश कोयटे ,गोदावरी विकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष पंडितराव चांदगुडे जिल्हा बँकेचे तालुका विकास अधिकारी ए डी काटे,चासनळीचे सरपंच निळकंठ चांदगुडे,गुरूदत पतसंस्थेचे अध्यक्ष ज्ञानदेव मांजरे ,गोदावरी पतसंस्थेचे उपाध्यक्ष वसंतराव दंडवते,नारायण मांजरे,संचालिका मंदाकिनी चांदगुडे,गौतम बँकेचे मुख्य व्यवस्थापक घेमुड,जेष्ठ नेते रामभाऊ बनकर,विश्वास आहेर,सोमनाथ चांदगुडे, काळे कारखान्याचे संचालक सचिन चांदगुडे,कोल्हे कारखान्याचे संचालक मनेष गाडे उपस्थित होते
पुढे बोलताना कोयटे म्हणाले सहकारी सोसायटीतील कर्मचाऱ्यांची प्रशिक्षण शिबिराची गरज निर्माण झाली आहे.त्याचबरोबर सहकारी पतसंस्था,सरकारी बँका यामधील कामकाजाचे स्वरूप,बदल होणार असून बँकांप्रमाणेच सहकारी पतसंस्थांच्या कामातही बदल होणार आहे. डिमांड ड्राफ्ट, पॅन कार्ड सारख्या सुविधा कालबाह्य होणार असून मोबाईल बँकिंग, क्यू.आर. कोड यासारख्या आधुनिक सुविधांच्या माध्यमातून कामकाज सुरू राहणार आहे. या सेवा ग्रामीण भागातील पतसंस्थानी आधुनिक तंत्रज्ञान आत्मसात करून सभासदांना सेवा देण्याचा प्रयत्न करावा.सहकारी तत्वावर शिक्षण संस्था, हॉस्पिटल उभारता येणार आहे सहकारी पतसंस्थांची शिबिरे, कर्ज देणे या बरोबरच सभासदांच्या जीवनावश्यक गरजा विविध योजना केंद्र व राज्य शासन उपलब्ध करून देणार आहे.कार्यक्रम यशस्वीतेसाठी गोदावरी प्रतिष्ठानचे रविराज चांदगुडे, युवराज चांदगुडे, माधुरी चांदगुडे,मछ्दिन्द् चांदगुडे, गणेश निरभवणे,राजेंद्र गावंड यांनी केले तर कार्यक्रमाचे सुत्रसंचालन ज्ञानेश्वर शिंदे यांनी तर आभार कैलास थोरात यांनी मानले.
चौकट करणे:गुजरात मधील अमूल, इफको लिज्जत यांसारख्या संस्थांनी देश पातळीवर सहकारात मोठे काम उभे केले आहे. असेच काम महाराष्ट्रात देखील केंद्र, शासनाने स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदा सहकाराचे स्वातंत्र मंत्रालयविभाग तयार केले या सहकार मंत्रालयाच्या माध्यमातून शहरी भागाबरोबर ग्रामीण भागातील संस्थाचा विकास होवून भविष्यात ग्रामीण भागातही सहकार चळवळ वाढणार आहे.- पंडितराव चांदगुडे
