कोपरगाव प्रतिनिधी:-
तालुक्यातील कोकमठाण शिवारात नगर – मनमाड महामार्गालगतच्या जंगली महाराज आश्रम परिसरात गेल्या सहा दिवसापासून योगीराज सद्गुरू श्री गंगागीरीजी महाराज १७५ वा अखंड हरिनाम सप्ताह सुरु आहे. या सप्ताह साठी लाखोंच्या संख्येने भाविक येत आहेत. या भाविकांना दररोज आमटी व भाकरीच्या महाप्रसादचे वाटप करण्यात येत आहे. त्यासाठी हजारो स्वयंसेवक दिवसरात्र परिश्रम घेत आहेत. वारकऱ्यांच्या या महाकुंभात खारीचा वाटा म्हणून कोपरगाव तालुक्यातील वारी येथील स्वयंसेवकानी रविवारी (दि.७) दिवसभर महाप्रसाद वाटप करीत सेवा दिली.
कोपरगाव तालुक्यातील वारीतील ग्रामपंचायत, जय बाबाजी भक्त परिवार व राहुल (दादा) मधुकरराव टेके पाटील चँरीटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने गेल्या वीस आठवड्यापासून एक दिवस वारीतील सार्वजनिक ठिकाणे, सर्व मंदिर, मज्जीद, सर्व बुधविहार, चर्च, प्राथमीक शाळा, माध्यमिक विद्यालय, स्मशानभूमी, गोदावरी नदीपात्र, बाजारतळ यासह इतरही ठिकाणी श्रमदानातून स्वच्छता अभियान व तणनाशक फवारणी अभियान सुरु आहे. यावेळी श्रमदानाच्या एकविसाव्या सप्ताह निमित्त कोकमठाण येथील १७५ व्या अखंड हरीनाम सप्ताहमध्ये वारीतील स्वच्छतादूतांनी स्वयंसेवक म्हणून सेवा देण्याचे ठरविले होते. त्यानुसार रविवारी सेवा देण्यात आली. सेवा दिल्याबद्दल सप्ताहकमिटीच्यावतीने वारीतील स्वयंसेवकांचा श्रीफळ व गुलाल उधळून सन्मान करण्यात आला. यावेळी सरपंच सतीशराव कानडे, जय बाबाजी भक्त परिवाराचे भाऊसाहेब टेके, विलास गाडेकर, सामाजिक कार्यकर्ते मधुकरराव टेके, वारी सेतू कार्यालयाचे संचालक रवींद्र टेके, सेवानिवृत्त बँक अधिकारी रावसाहेब जगताप, “लोकमत” चे उपसंपादक रोहित टेके, ग्रामपंचायत कर्मचारी रावसाहेब वाघ, संदीप आगे यांच्यासह इतरही ग्रामस्थांनी सेवा दिली.

फोटोओळी:-
हरीनाम सप्ताहात सेवा दिल्याबद्दल सप्ताहकमिटीच्यावतीने वारीतील स्वयंसेवकांचा श्रीफळ व गुलाल उधळून सन्मान करण्यात आला.
