
कोपरगांव प्रतिनिधी:-
तालुक्यातील बहादराबाद गावासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जलजीवन मिशन अंतर्गत पिण्याच्या पाणी योजनेसाठी १ कोटी ६९ लाख ८९६ रूपये खर्चाच्या कामास नुकतीच प्रशासकीय मान्यता मिळाली असुन त्याच्या ई निवीदेवी प्रक्रिया पुर्ण झाल्याची माहिती सरपंच व भाजपा युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष विक्रम पाचोरे यांनी दिली. या सर्व कामांचा पाठपुरावा भाजपाच्या प्रदेश सचिव स्नेहलता कोल्हे यांनी केल्याचेही ते म्हणाले.
श्री. विक्रम पाचोरे यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात पुढे म्हटले आहे की, बहादराबादच्या दत्तवाडी, म्हसोबा वस्ती, कोपरगांव संगमनेर रोड वस्ती येथील रहिवासीयांना पिण्याच्या पाण्यासाठी मोठया प्रमाणांत अडचण निर्माण झाली होती त्यासाठी गांवपातळीवर सरपंच, उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्यांनी ग्रामसेवक श्रीमती अनिता दिवे यांच्या मार्फत आवश्यक त्यासर्व कागदपत्रांचा प्रस्ताव तयार केला त्याबाबतचा सर्व पाठपुरावा तत्कालीन आमदार स्नेहलता कोल्हे यांनी करून त्याच्या १ कोटी ६९ लाख ८९६ रूपये प्रशासकीय खर्चास २२ एप्रिल २०२२ रोजी मान्यता मिळुन दिली. त्याच्या ई निवीदेची प्रक्रियाही नुकतीच पुर्ण करण्यात आली आहे. उपसरपंच सौ संगिता आण्णासाहेब पाचोरे व सर्व सदस्यांचे याकामी मोलाचे सहकार्य लाभले असेही ते म्हणाले.
