एस. एस. जी. एम. महाविद्यालयात वनस्पतीशास्त्र विभागाचे एकदिवसीय वेबिनार संपन्न…

Uncategorized

कोपरगाव प्रतिनिधी:- येथील श्री. सद्गुरू गंगागीर महाराज सायन्स, गौतम आर्टस् अँड संजीवनी कॉमर्स कॉलेजमध्ये आय. क्यु. ए. सी. व वनस्पतीशास्त्र विभाग यांचे संयुक्त विद्यमाने ‘रिसर्च मेथडॉलॉजी अँड आय. पी.आर’ या विषयावरील एकदिवसीय वेबिनार आभासी प्रणालीद्वारे संपन्न झाले. चर्चासत्रासाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून एम. डी. कॉलेज, परेल, मुंबई येथील सहायक प्राध्यापक डॉ.अनिरुद्ध पाटील उपस्थित होते. त्यांनी आपल्या भाषणातून आय. पी. आर. मध्ये समाविष्ट होणाऱ्या विविध बाबींची सखोल माहिती दिली. तसेच पेटंट म्हणजे नेमके काय असते हे देखील विस्ताराने स्पष्ट केले. चर्चासत्राच्याअध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रमेश सानप होते.अध्यक्षीय विचार व्यक्त करतांना ते म्हणाले की,ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षण क्षेत्रातील विविध घडामोडींवर चर्चा होणे गरजेचे आहे. रयत शिक्षण संस्था अलीकडच्या काळात नव्या शैक्षणिक आव्हानांचा विचार करीत या गोष्टीना विशेष महत्व देत आहे. याचाच एक भाग म्हणून महाविद्यालयीन स्तरावर विविध समकालीन विषयांवर विविधांगी चर्चा होत आहे. विद्यार्थ्याना आय. पी. आर. म्हणजे काय हे समजावे व त्यांची शोध दृष्टी समृध्द व्हावी हा आजच्या या चर्चासत्राच्या आयोजनाचा मुख्य उद्देश होता.


चर्चासत्राचे प्रास्ताविक वनस्पतीशास्त्र विभाग प्रमुख प्रा. डॉ. बी. डी. वर्पे यांनी केले. पाहुण्यांचा परिचय आय. क्यू. ए. सी. समन्वयक डॉ.निलेश मालपुरे यांनी करून दिला. सूत्रसंचालन कु. सोनाली गोसावी यांनी केले तर डॉ.एस. बी. दवंगे यांनी आभार मानले.सदर प्रसंगी वनस्पती शास्त्र विभागातील सर्व प्राध्यापक, संशोधक तसेच विद्यार्थी ऑनलाईन उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *