
कोपरगाव प्रतिनिधी:-
कोपरगाव तालुक्यातील रवंदे या ठिकाणी रहदारीला अडथळे निर्माण होत असल्या कारणाने आज सोमवार दि.१८ जुलै २०२२ रोजी जेसीबीच्या सहाय्याने पोलिस बंदोबस्तात रवंदा ग्रामपंचायतीने अनाधिकृत अतिक्रमणे काढली आहे.रवंदा गावातील बाजारातळाकडे जाणार्या रस्त्यावर वाहन चालकांनी वर्दळ होत असल्याने विद्यार्थी वृध्द महिलांना नाहक त्रास सहन करावा लागत होता.


वाहन चालवतांना वाहन चालकांनाही अडचण होवुन त्रास सहन करावा लागत होता.या अनाधिकृत अतिक्रमण मोहिमेसाठी ग्रामीण पोलिस स्टेशनचे पोलिस निरिक्षक दौलतराव जाधव यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.यावेळी कुठलाही अनुचित प्रकार घडला नसून शांततेत आणि नागरिकांनी प्रतिसाद देत हि अतिक्रमण काढण्यात आली आहे.

यावेळी पंचायत समितीचे अधिकारी बिडीओ सचिन सुर्यवंशी साहेब सरपंच भानुदास फकिरा भवर उपसरपंच संदीप विठ्ठल कदम ग्रामविकास अधिकारी राजेन्द्र बागले कर्मचारी वृद उपस्थित होते. यावेळी बघ्यांची गर्दी जमली होती.
