संजीवनीच्या सिव्हिल व मेकॅनिकल इंजिनिअरींग विभागास पुन्हा एनबीए मानांकन:- श्री. अमित कोल्हे…

Uncategorized

पुन्हा मानांकन प्राप्त झाल्यामुळे दर्जा आणि गुणवत्तेवर शिक्कामोर्तब…
कोपरगांव प्रतिनिधी:-
संजीवनी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या सिव्हिल इंजिनिअरींग व मेकॅनिकल इंजिनिअरींग या दोन विभागांना नॅशनल बोर्ड ऑफ अॅक्रिडीटेशन (एनबीए), नवी दिल्लीने पुन्हा पुढील तीन वर्षांसाठी मानांकन बहाल करून संजीवनी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या दर्जा आणि गुणवत्तेवर शिक्कामोर्तब केले आहे. संजीवनी अभियांत्रिकी महाविद्यालय हीे ग्रामिण महाराष्ट्रातील दुसरी व उत्तर महाराष्ट्रातील ऑटोनॉमस दर्जा प्राप्त संस्था आहे. यामुळे संजीवनी ही उत्तर महाराष्ट्रातील ऑटोनॉमस दर्जा असलेली एनबीए मानांकन प्राप्त एकमेव संस्था ठरली आहे, अशी माहिती संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे मॅनेजिंग ट्रस्टी श्री. अमित कोल्हे यांनी दिली आहे.
महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात दुसरी संस्था आणि उत्तर महाराष्ट्रात एकमेव शैक्षणिक स्वायत्ता (ऑटोनॉमस) दर्जा प्राप्त असणाऱ्या संजीवनी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या या अभुतपुर्व उपलब्धीबाबत संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे कार्याध्यक्ष श्री नितीनदादा कोल्हे, मॅनेजिंग ट्रस्टी श्री अमित कोल्हे, विश्वस्त श्री सुमित कोल्हे यांनी डायरेक्टर डाॅ. ए.जी. ठाकुर, विभाग प्रमुख डाॅ. एम. एस. पुरकर, डाॅ. एम. व्ही. नागरहल्ली, डाॅ. ए. एस. सय्यद व श्री के. एम. भावसार यांचे अभिनंदन करून श्री श्री नितिनदादा यांनी या सर्वांचा छोटेखानी कार्यक्रमात सत्कार केला.
पत्रकात श्री. अमित कोल्हे यांनी म्हटले आहे की माजी मंत्री व संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे संस्थापक अध्यक्ष कै. शंकरराव कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली २००३ साली एनबीएच्या कसोटीला सामोरे जाणारे संजीवनी अभियांत्रिकी महाविद्यालय हे ग्रामिण महाराष्ट्रातील एकमेव अभियांत्रिकी महाविद्यालय होते. तेव्हापासुन सर्वच पात्र विभाग मानांकन प्राप्त ठरले आहेत. सिव्हिल इंजिनिअरींग व मेकॅनिकल इंजिनिअरींग विभागांनी मागील तीन वर्षातील प्रत्येक विभागातील प्रवेश संख्या, पी.एच.डी. असणारे शिक्षक , विद्यार्थी-शिक्षक प्रमाण, प्रथम वर्षात प्रवेश घेतलेल्या सलग चार वर्षात उत्तिर्ण होणाऱ्या विध्यार्थ्यांचे वाढते प्रमाण, उच्च शिक्षणासाठी जाणारे विद्यार्थी आणि संस्थेच्या ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागामार्फत विध्यार्थ्यांना नामांकित कंपन्यांमध्ये मिळणाऱ्या नोकऱ्यांचे प्रमाण, शिक्षकांनी आधुनिक ज्ञानवृध्दीसाठी पुर्ण केलेले परीसंवाद, सादर केलेले शोधनिबंध व कार्यशाळांची संख्या, कन्सलटन्सी, विध्यार्थ्यांनी विविध क्षेत्रात मिळविलेले प्राविण्य, सुसज्य प्रयोगशाळा , नामांकित कंपन्या व परदेशी विद्यापीठांशी केलेले सामंजस्य करार, अशा अनेक बाबींचा चढत्या कमानीचा अहवाल एनबीए कार्यालयाला सादर केला होता. एनबीए कार्यपध्दतीनुसार एनबीए समितीने दोनही विभागांनी सादर केलेल्या सर्व बाबींची पुराव्यासहीत परीमानांनुसार पडताळणी केली आणि भेटीनंतर लागलीच एका महिन्यात दोनही विभागांना पुढील तीन वर्षांसाठी एनबीए मानांकन बहाल केल्याबाबतचे अधिकृत पत्र दिले.
महाराष्ट्रातच नव्हे तर संपुर्ण देशात अनेक अभियांत्रिकी महाविद्यलये आहेत. परंतु फार थोड्या संस्था एनबीए च्या कसोट्यानां सामोरे जाण्याचे धाडस करतात. मात्र महाराष्ट्राच्या ग्रामिण भागातुन आत्मविश्वासच्या जोरावर २००३ पासुन एनबीए च्या कसोट्यांना सामोरे जाण्याचे संजीवनी अभियांत्रिकी महाविद्यालय धाडसी पावुल टाकित आहे. सध्या आवुटकम बेस्ड एज्युकेशनच्या माणकाप्रमाणे तपासणी करण्यात येते. अतिशय कठीण मानके असलेल्या कसोट्यांना दोनही विभाग सामोरे गेले. आता दोनही विभागाने दर्जा व गुणवत्ता टिकवुन ठेवत पुन्हा तीन वर्षांसाठी मानांकन प्राप्त करून संजीवनीच्या शिरेपेचात मानाचा तुरा खोवला आहे, असे श्री. कोल्हे यांनी शेवटी म्हटले आहे.

फोटो ओळीः- संजीवनी अभियांत्रिकी महाविद्यालयांच्या सिव्हिल इंजिनिअरींग व मेकॅनिकल इंजिनिअरींग विभागांना पुन्हा पुढील तीन वर्षांसाठी एनबीए मानांकन प्राप्त झाल्याबध्दल कार्याध्यक्ष श्री. नितीनराव कोल्हे यांचे हस्ते प्राचार्य, विभाग प्रमुख यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी मॅनेजिंग ट्रस्टी श्री. अमित कोल्हे उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *