बच्चूभाऊ कडू यांचा जन्मदिन अनोख्या पध्दतीने साजरा..!

Uncategorized

कोपरगाव प्रतिनीधी
(देवळाली प्रवरा):-
कोरोनाने पालक गमावलेल्या मुलांना शालेय साहित्याची मदत देऊन देवळाली प्रवरा येथे प्रहार चे संस्थापक अध्यक्ष मा. ना. बच्चूभाऊ कडू साहेब यांचा जन्मदिन अनोख्या पद्धतीने साजरा करणेत आला.
प्रसंगी प्रहार जनशक्ती पक्षाचे श्रीरामपूर विधानसभा अध्यक्ष आप्पासाहेब ढुस, कोरोना एकल महिला पुनर्वसन समितीचे राहुरी तालुका सचिव प्रशांत कराळे, प्रहार चे देवळाली प्रवरा शहर अध्यक्ष विजय कुमावत, राहुरी फॅक्टरी शहर अध्यक्ष शरद वाळुंज, उपाध्यक्ष शिवाजीराव मुसमाडे, एकनाथ वाणी, गणेश भालके, शाखा अध्यक्ष अमोल अंबिलवादे, संघटक प्रभाकर कांबळे, श्री छत्रपती शिवाजी माध्यमिक विद्यालयाचे पर्यवेक्षक नानासाहेब बाजीराव काळे, शिक्षक गणेश भांड आदी उपस्थित होते.
प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष मा. ना. बच्चूभाऊ कडू यांचे जन्मदिनाच्या निमित्ताने श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघातील देवळाली प्रवरा आणि राहुरी फॅक्टरी येथील प्रहार जनशक्ती पक्ष आणि महाराष्ट्र कोरोना एकल महिला पुनर्वसन समिती राहुरी च्या संयुक्त विद्यमाने देवळाली प्रवरा हद्दीतील कोरोनाने एकल झालेल्या मुलांना देवळाली प्रवरा येथील श्री छत्रपती शिवाजी माध्यमिक विद्यालयातीळ पर्यवेक्षक नानासाहेब काळे सर यांचेकडे शालेय साहित्य वाटप करण्यासाठी सुपूर्द करणेत आले.
प्रसंगी बोलताना प्रहारचे श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष आप्पासाहेब ढुस म्हणाले की, कोरोनाने एकल झालेल्या देवळाली प्रवरा हद्दीतील महिलांना दिवाळी भाऊबीजेला साडी आणि फराळ वाटप करून संघटनेने अनोखी भाऊबीज साजरी केली आहे, तसेच अत्यंत गरीब कुटुंबातील पाचवी पर्यंतच्या नऊ एकल मुलींना प्रत्येकी दहा हजार रुपयांचे राष्ट्रीय बचत पत्र वाटपही नुकतेच करणेत आले असून आज आमचे श्रद्धास्थान असलेल्या मा. बच्चूभाऊ कडू यांचा जन्मदिन आम्ही एकल मुलांना शालेय साहित्य वाटप करून साजरा केला आहे. यानंतर या एकल महिलांसाठी लवकरच एक उद्योग उभारून त्यांच्या हाताला कायमस्वरूपी काम देऊन त्यांना स्वावलंबी करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील असल्याचे ढुस यांनी या प्रसंगी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *