कोपरगाव विधानसभा मतदारसंघ विकासाच्या दिव्याला सर्वोच्च प्राधान्य देऊ:- विवेकभैय्या कोल्हे…

Uncategorized

कोपरगांव प्रतिनिधी:-
गेल्या अडीच वर्षात कोपरगाव मतदार संघात कामापेक्षा अभासी माध्यमाच्या (व्हॉटसअप) विकासनिधीचीच चर्चा झाली, आता राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस विराजमान झाल्याने येथे सत्तेच्या दिव्यापेक्षा मतदारसंघ विकासाच्या दिव्याला आपण सर्वोच्च प्राधान्य देऊ असे प्रतिपादन जिल्हा सहकारी बँकेचे संचालक विवेकभैय्या कोल्हे यांनी केले. तालुक्यातील देर्डे को-हाळे परिसरातील ओम साई लॉन्स येथे नवनिर्वाचित सोसायटी व ग्रामपंचायत सदस्यांचा शनिवारी सत्कार करण्यात आला त्याप्रसंगी ते अध्ययपदावरून बोलत होते. प्रारंभी माहेगाव देशमुखचे सरपंच बाळासाहेब पानगव्हाणे यांनी उपस्थितांचे स्वागत केले. बाळासाहेब वक्ते यांनी प्रास्तविक करून स्व. निवृत्ती गवळी, इंदुबाई पानगव्हाणे, विठाबाई गमे, गणपत गुंड यांना श्रद्धांजली वाहिली.


याप्रसंगी सर्वश्री. ज्ञानेश्वर होन, दिपक गायकवाड, ज्ञानदेव औताडे, शिवाजीराव वक्ते, अरूणराव येवले, आप्पासाहेब दवंगे यांची भाषणे झाली.
याप्रसंगी सर्वश्री. संजय होन, निवृत्ती कोळपे, देवराम गवळी, राजेंद्र कोळपे, सतीश आव्हाड, बापुसाहेब औताडे, संजय औताडे, रमेश औताडे, चंद्रकांत औताडे, साहेबराव शिंदे, पुंजाजी राऊत, तुकाराम गुडधे, आनंदराव जावळे, मधुकरराव वक्ते, राजेंद्र पानगव्हाने, आप्पासाहेब औताडे, विश्वनाथ जावळे, शिवाजी जावळे, अशोक औताडे आण्णiसाहेब गुरसळ, निरंजन गुडघे, बाबासाहेब फटांगरे, बाळासाहेब कोल्हे, डॉ. नानासाहेब होन, आबासाहेब पवार, अशोक पवार, प्रशांत होत, अमोल गवळी, भाऊसाहेब कोळप, किरण कोळपे, आप्पासाहेब जाधव, बापू पवार, राजेंद्र चांडे, धर्मा दहे, एकनाथ बढ़े, परशराम वाबळे, नानासाहेब ढोमसे, विजय कदम, सुनिल कदम, सोपान चिने, गोपीनाथ निळकंठ यांच्यासह विविध संख्याचे आजी माजी पदाधिकारी, संचालक, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थीत होते.
श्री विवेकभैय्या कोल्हे पुढे म्हणाले की, माजीमंत्री स्व: शंकरराव कोल्हे यांनी वयाच्या तिशीमध्ये या भागात सहकारी संस्थांचे जाळे विणले, शेती उत्पन्न वाढीवासाठी शेतकऱ्यांना आर्थिक भागभांडवल उभे करत त्यांच्यात विकासाचे परिवर्तन घडवून आणले. शेतीला जोडधंदे शोधून त्यातून सहकारी संस्था उभ्या केल्या, अल्पभूधारक शेतकऱ्यांना जवळ घेत त्यांच्या माध्यमातून संजीवनी साखर कारखान्याची उभारणी केली, पाणी आडवा पाणी जिरवा मोहिमेतून भूगर्भातील पाण्याची पातळी वाढवली. आगामी आर्थिक स्थित्यंतरामध्ये येथील शेती आणि शेतकरी टिकला पाहिजे यासाठी राज्यात सर्वप्रथम विविध रासायनिक उपपदार्थांची निर्मिती संजीवनीत केली. बिपिनदादा कोल्हे यांनी त्यात लक्ष घालून ही कामधेनु बंद पडू न देता विकासाच्या दिशेने पुढे नेण्याचा प्रयत्न केला,
स्व. शंकरराव कोल्हे यांचे पाटपाणी व शेती असे अतूट नाते होते. पाटपाण्याचे प्रश्न सोडवुन तुटीच्या उर्ध्व गोदावरी खोऱ्यात पश्चिमेचे पाणी पुर्वेला वळविण्याच्या कामास मंजुरी ‘मिळवली, आता मात्र दारणेवर बिगरसिंचन पाण्याचे आरक्षण वाढत असतांना तालुक्याचे लोकप्रतिनिधी त्याकडे दुर्लक्ष करतात, विकासनिधीच्या गप्पा मारतात. तत्कालीन आमदार स्नेहलता कोल्हे यांच्या विकासकामांचे श्रेय स्वतःच लाटून त्याची उद्घाटने करत आहेत. त्यांनी अडीच वर्षात फक्त व्हॉटसअॅप घोषणा केल्या. आता तिघाडीचे सरकार सत्तेतून पायउतार होत मुख्यमंत्री म्हणुन एकनाथ शिंदे यांनी कमांड सांभाळली आहे, त्यांच्या जोडीला अनुभवी देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री म्हणून काम पहात आहेत.


कोपरगाव विधानसभा मतदार संघाचे प्रलंबीत प्रश्न सोडविण्यासाठी पुन्हा नव्या जोमाने कामाला लागु असे सांगून त्यांनी सहकारी सोसायट्या आणि ग्रामपंचायती या ग्रामीण व्यवस्थेला बळकटी देणारा कणा आहे, त्याच्या संचालक पदाची ज्यांना संधी मिळाली त्यांनी गांव विकासात सर्वप्रथम लक्ष्य घालावे त्यातून प्रगतीचे एक – एक शिखरे पादाक्रांत करावी असेही ते म्हणाले. शेवटी सरपंच बाळासाहेब पानगव्हाणे यांनी आभार मानले.

फोटो ओळी:- कोपरगाव
तालुक्यातील देर्डे को-हाळे परिसरातील ओम साई लॉन्स येथे नवनिर्वाचित सोसायटी व ग्रामपंचायत सदस्यांचा शनिवारी जिल्हा सहकारी बँकेचे संचालक विवेकभैय्या कोल्हे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *