कोपरगाव ते पंढरपूर सामाजिक संदेश देणाऱ्या सायकल वारीचे झाले प्रस्थान…

Uncategorized

कोपरगाव प्रतिनिधी:-
कोपरगाव ते पंढरपूर सायकल वारीचे गुरुवारी प्रस्थान झाले आहे.पाऊले चालती पंढरीची वाट या भावभक्तीने विठुरायाच्या दर्शनाची ओढ लागलेले हे वारकरी आपली दोन वर्षांपासून सुरू केलेली सायकल वारी परंपरा मनोभावे जपत आहेत.४१ वारकरी कोपरगाव ते पंढरपूर सायकल वारीसाठी निघाले असून त्यांना कोपरगावकरांनी शुभेच्छा दिल्या.
या सायकल वारीद्वारे वृक्षारोपण करा,पाणी बचत,व्यसनमुक्ती,आरोग्याच्या उत्तम सवयी जोपासा असे विविध सामाजिक संदेश प्रवासादरम्यान दिले जातात. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खडतर काळ येऊन गेलेला असतांना निरोगी व तंदुरुस्त शरीर ठेवण्यासाठी दैनंदिन शारिरीक व्यायामाची सवय,सायकल किंवा मैदानी कसरती करणे याकडे लक्ष वेधुन या सायकल वारीने समाजाला आरोग्याकडून अध्यात्मातून असा मौल्यवान मंत्र दिला आहे.
पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव,हर्षवर्धन गवळी,अमृत संजीवनीचे अध्यक्ष पराग संधान,विजयराव आढाव, संदीप देवकर,केशवराव होन,प्रशांत होन,विवेक खांडेकर, संदीप शिरोडे, बापूसाहेब सुरळकर अनिल मुसमाडे दिनेश कोल्हे,बाळासाहेब निकोले,मनोज आहेर,कैलास बहिरट, धीरज बोरावके,देविदास जगताप,मतीन शेख,राजेंद्र निकम,शंकर निकम,नितीन त्रिभुवन,संतोष पवार,संतोष नेरे,निलेश खरमाडे,सुधीर खर्डे,प्रशांत निकुंभ,मनीष फुगे,अविनाश निकम,स्वप्नील झावरे,दीपक सुपेकर,राम लबडे,राजेंद्र सालके,अनंत बर्गे,सागर जाधव, प्रशांत शहाणे,गौरव आढाव,निरंजन देवकर,प्रतीक कोल्हे,उमेश लोंढे,सचिन शिंदे,सचिन त्रिभुवन आदी या वारीमध्ये सहभागी झालें आहेत.
या वारकरी बांधवांना संजीवनी समूहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे, भाजपा प्रदेश सचिव स्नेहलता कोल्हे, युवानेते विवेकभैय्या कोल्हे यांनी शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी गोदावरी दूध संघाचे अध्यक्ष राजेश परजणे, शिवसेना उपजिल्हाप्रमुख कैलास जाधव,भाजपा शहराध्यक्ष दत्ता काले,नितीन पोळ यांच्यासह विविध संस्थांचे आजी माजी पदाधिकारी, कार्यकर्ते, वारकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *