विद्यार्थ्यांनी ध्येय साध्य करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा करावी:- स्नेहलताताई कोल्हे…

Uncategorized

कोपरगाव प्रतिनिधी:-
प्रत्येकाच्या जीवनात यश- अपयशाचे चढ उतार होत असतात, दहावी बारावी गुणवंत विद्यार्थ्यांनी जीवनातील अंतिम ध्येय साध्य करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा करावी असे प्रतिपादन भाजपाच्या प्रदेश सचिव स्नेहलता कोल्हे यांनी केले. शिक्षण गुणवत्तेतून आदिवासी समाजाच्या द्रौपदी मुर्मू सर्वोच्च राष्ट्रपती पदावर विराजमान होणार असुन हा आदर्श सर्वांना प्रेरणादायी आहे असेही त्या म्हणाल्या.
शहरातील प्रजापिता ब्रम्हकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालयाच्या वतीने रविवारी तालुक्यातील दहावी- बारावी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यांत आला त्याप्रसंगी त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी आमदार आशुतोष काळे होते.
प्रारंभी प्रजापिता ब्रम्हकुमारी सरलदिदि यांना बाळशास्त्री जांभेकर पुरस्कार मिळाल्याबददल त्यांचा संजीवनी व कोसाका उद्योग समुहाच्यावतीने सत्कार करण्यांत आला. डॉ. नाईकवाडे यांनी प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाची स्थापना आणि त्यातून जगातील १४० देशांमध्ये ४५०० सेवा केंद्र निरंतर सुरू असल्याची माहिती देत दहा लाख विद्यार्थी ज्ञानाचे अध्ययन करत असल्याचे सांगितले. लक्ष्मण लासनकर सर यांनी प्रत्येक परीक्षेत यश मिळवताना कुठल्या गोष्टीवर प्राधान्याने लक्ष दिले पाहिजे याची विद्यार्थ्यांना माहिती दिली. याप्रसंगी सौ रेणुका विवेक कोल्हे, नगरसेवक स्वप्निल निखाडे, मंदार पहाडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष पवार यांच्यासह ईश्वरीय विश्व विद्यालयाचे सर्व सहकारी, कोपरगाव शहर पंचक्रोशीतील विविध संस्थांचे मान्यवर उपस्थित होते.
सरलादिदी यांनी विद्यार्थ्यांना ध्यानाचे महत्व सांगत परमात्म्याचे दिव्यरूप ज्योतीबिंदू प्रमाणे आहे. दहावी बारावीतील यश आयुष्याची नवी सुरुवात करते तेव्हा विद्यार्थ्यांनी हुरळून जाऊ नये.
अध्यक्षपदावरून बोलतांना आमदार आशुतोष काळे म्हणाले की, विद्यार्थी हा शेवटपर्यंत ज्ञानार्थी असतो, अभ्यासात एकाग्रतेला विशेष महत्व आहे त्यामुळेच मुलांनी नव्वद टक्क्यापेक्षा जादा गुण मिळवले आहे; त्यांचे विशेष अभिनंदन.
सौ. स्नेहलता कोल्हे पुढे म्हणाल्या की, सरलादिदींनी छोट्या जागेत जगाला गवसणी घालण्याचे मोठे काम करत सामाजिक कार्यातून २४ पेक्षi जादा राज्य व राष्ट्रीय पुरस्कार मिळवलेले आहेत. विद्यार्थ्यांनी भ्रमणध्वनीच्या नादी न लागता आपले ध्येय गाठण्यासाठी लक्ष विचलीत होणार नाही याची काळजी घ्यावी. अभ्यासातून आपल्या परिसराचा व आई-वडीलांचा नांवलौकीक वाढवावा. ज्ञान ही मोठी संपत्ती आहे. अभ्यासाबरोबरच शारीरीक आणि मानासीक फिटनेस तितकाच महत्वाचा आहे, व्यायाम,- ध्यान-मनन-चिंतन वाचन योग साधना यालाही प्रत्येकाने वेळ द्यावा. दहावी-बारावीत नव्वदीच्यापुढे गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांचा आता महत्वाचा टप्पा सुरु झाला आहे असेही त्या म्हणाल्या सुत्रसंचलन व आभार ब्रह्मकुमारी चैतन्य दीदी यांनी मानले.

फोटोओळी:- कोपरगाव
प्रजापिता ब्रम्हकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालयाच्या वतीने रविवारी दहावी- बारावी गुणवंत विद्यार्थ्यांचा कोपरगाव येथे सत्कार करण्यांत आला. भाजपच्या प्रदेश सचिव स्नेहलता कोल्हे, आमदार आशुतोष काळे, ब्रह्मकुमारी सरला दिदी, आदी यावेळी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *