अंबिका सोसायटीच्या अध्यक्षपदी वसंतराव गोरे तर उपाध्यक्षपदी दिलीप टेके यांची बिनविरोध निवड…

Uncategorized

कोपरगांव प्रतिनिधी:-
तालुक्यातील वारी येथील अंबिका विविध कार्यकारी सोसायरीच्या अध्यक्षपदी कोल्हे गटाचे वसंतराव आण्णासाहेब गोरे तर उपाध्यक्षपदी दिलीप चांगदेव टेके यांची रविवारी बिनविरोध निवड झाली. अध्यक्षस्थानी माजी सभापती मच्छिंद्र टेके होते.
अंबिका सोसायटीची निवडणुक बिनविरोध होऊत त्यात सर्वश्री. मच्छिंद्र टेके, रविंद्र गोर्डे, दत्तात्रय ठोंबरे, ललीता टेके, मच्छिंद्र टिक्कल, वाल्मीक भाकरे, बाळासाहेब आवारे, रंजना गोरे, सविता टिक्कल, जयेश वालझाडे, सुभाष डहारे यांची संचालक म्हणून निवड झाली.
नवनिर्वाचित अध्यक्ष वसंतराव गोरे व उपाध्यक्ष दिलीप टेके यांचा मच्छिंद्र टेके यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. याप्रसंगी ते म्हणाले की, ग्रामीण अर्थकारणाला दिशा देण्यांसाठी स्व. शंकरराव कोल्हे यांनी संघर्षमय काम केले. संजीवन उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे यांनी सहकाराच्या माध्यमांतून शेतकऱ्यांच्या जीवनात जलसमृद्धी निर्माण करण्याचा प्रयत्न केला.
सत्कारास उत्तर देतांना अध्यक्ष वसंतराव गोरे म्हणाले की, जिल्हा बँकेचे संचालक विवेकभैय्या कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली अंबिका सोसायटीच्या प्रगतीत योगदान देऊन शेतकऱ्यांसाठी सर्व योजनांची अंमलबजावणी करू. शेवटी सचिव जालींदर टेके यांनी आभार मानले.याप्रसंगी सर्वश्री. बाबुराव गोर्डे, आप्पासाहेब गोरे, फकिरा टेके, बापुसाहेब टिक्कल, जगन भोकरे, विशाल गोर्डे, सुभाष पवार, रणजित खैरनार यांच्यासह विविध संस्थांचे आजी-माजी पदाधिकारी, संचालक, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *