
कोपरगावात ना.आदित्य ठाकरेंच्या वाढदिवसानिम्मित शिवसेनेच्या वतीने वृक्षारोपण करण्यात आले.
ठाकरे कुटुंबातील प्रथम आमदार, पर्यावरण आणि पर्यटन मंत्री, मुंबई उपनगराचे पालकमंत्री आणि युवासेना प्रमुख आदित्य साहेब ठाकरे यांच्या वाढदिवसा निम्मित आज शिवसेना जिल्हाप्रमुख मा.श्री.राजेंद्रजी झावरे यांच्या मार्गदर्शनाखाली व शहरप्रमुख कलविंदरसिंग दडीयाल, युवासेना विस्तारक सुनीलजी तिवारी व वाहतूकसेना जिल्हाप्रमुख इरफान शेख यांच्या नेतृत्वाखाली कोपरगाव शहर शिवसेना व युवसेनेच्या वतीने कोपरगावतील सप्तर्षीमळा भागात
वृक्षारोपण करण्यात आले. कोपरगावात निसर्ग उपयोगी झाडे त्या मध्ये पिंपळ,वड,कडुलिंब,चिंच आशा प्रकारची झाडे विविध भागात लावणार असल्याचे शहरप्रमुख कलविंदरसिंग दडीयाल यांनी सांगितले. झाडे लावा झाडे जगवा हा पर्यावरण पूरक उपक्रम या पुढेही शिवसेनेच्या माध्यमातून कोपरगावात राबवणार असल्याचे प्रवक्ते राहुल देशपांडे यांनी सांगितले. या पर्यावरण पूरक उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत असून शिवसेनेच्या माध्यमातून पर्यावरण संरक्षण व संवर्धनाचा योग्य संदेश समाजात पोहचत आहे. या वेळी युवानेते विक्रांत झावरे,कोपरगाव शिवसेना सचिव बाळासाहेब साळुंके, प्रवक्ते राहुल देशपांडे, उपशहरप्रमुख शेखर कोलते,सुनील कुंढारे,विभागप्रमुख निखिल मढवई, विजय सोनवणे, संजय बाविस्कर,श्रीपाद भसाळे,भूषण वडांगळे,अक्षय नन्नावरे,वेदांत कर्पे,सतीश लोळगे,सचिन मोरे,बंडू गवळी आदी कोपरगाव शिवसेना व युवासेना पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
