कोपरगाव तालुक्यातील कासली शिवारात शेततळ्यात बुडून 32 वर्षीय युवकाचा दुर्दैवी मृत्यू…

Uncategorized

कोपरगाव प्रतिनिधी:- कोपरगाव तालुक्यातील कासली शिवारात शेततळ्यात बुडून 32 वर्षीय इसमाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. विनोद नामदेव भागवत असे मयत इसमाचे नाव असून तो कोपरगाव तालुक्यातील जेऊर पाटोदा येथील रहिवासी आहे. सदर घटनेने कोपरगाव तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे.
सदरचे सविस्तर वृत्त असे की, कोपरगाव तालुक्यातील जेऊर पाटोदा येथील रहिवासी विनोद नामदेव भागवत वय 32 वर्ष यांची कासली शिवारात शेती मध्ये स्वतःचे शेततळे आहे. या शेततळ्यात पाणी भरण्याचे काम सुरू होते त्यासाठी विनोद हे त्या ठिकाणी गेले असता पाय घसरून ते तळ्यात पडले सदर शेतावर शेतातील गडी व जेसीबी ड्रायव्हर होते त्यांच्या ही घटना उशिरा लक्षात आली. ३ जुन रोजी दुपारी साडे पाच वाजेच्या सुमारास सदर मृतदेह आढळून आला असून सदर मृतदेह कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी आणण्यात आला आहे.
या बाबत कोपरगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून याबाबत पुढील तपास पो.नि. दौलतराव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली हेड कॉन्स्टेबल निजाम शेख हे तपास करीत आहे.
विनोद भागवत यांच्या पाश्चात् आई , वडील, भाऊ, पत्नी, एक मुलगा, दोन मुली असा परिवार आहे. सदर घटनेने कोपरगाव तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *