
कोपरगांव प्रतिनिधी:-
सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याच्या ६१ व्या गळीत हंगामाचा शुभारंभ संचालक निवृत्ती कारभारी बनकर व सौ. मंदाताई निवृत्ती बनकर या उभयतांच्या हस्ते, संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे यांच्या अध्यक्षतेखाली व सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्यांचे अध्यक्ष विवेकभैय्या कोल्हे, भाजपाच्या नेत्या सौ. स्नेहलताताई कोल्हे यांच्या प्रमुख उपस्थितीत बुधवार दि. १ नोव्हेंबर रोजी सकाळी ठिक ११.१५ वाजता संपन्न होणार असल्याची माहिती उपाध्यक्ष मनेष दिनकरराव गाडे, सर्व संचालक, मॅनेजिंग डायरेक्टर बाजीराव जी. सुतार, व साखर सरव्यवस्थापक शिवाजीराव दिवटे यांनी दिली.
तरी सर्व उस उत्पादक सभासद शेतकरी बांधवांनी या गळीत हंगाम शुभारंभ प्रसंगी मोठया संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन करण्यांत आले आहे.
