
कोपरगाव प्रतिनिधी:-
महाराष्ट्र राज्य नगरपालिका व महानगरपालिका शिक्षक संघ महाराष्ट्र राज्य यांच्यामार्फत दिला जाणारा
राज्यस्तरीय आदर्श तंत्रस्नेही शिक्षक पुरस्कार २०२४
श्री अर्जुन विश्वनाथ शिरसाट (उपाध्यापक)
नगरपालिका शाळा क्रमांक 10, येवला रोड, कोपरगाव
यांना राज्य अध्यक्ष अर्जुन कोळी,ज्योत्स्ना भरडा उपाध्यक्ष,संजय आवळे उपाध्यक्ष, सुभाषराव कोल्हे कार्याध्यक्ष,किशोर पाडवी सरचिटणीस यांनी जाहीर केले. नाशिक या ठिकाणी पुरस्कारांचे वितरण होणार आहे.
शैक्षणिक कार्य:
नगरपालिका शिक्षण मंडळ, कोपरगाव येथे एकूण 14 वर्षे सेवा पूर्ण.
लॉकडाऊन काळात मुलांचे शिक्षण सुरू राहावे यासाठी Online Study नावाचे युट्युब चॅनेल सुरू करून त्यावर मुलांच्या पायाभूत क्षमता विकसित करण्यासाठी गणित, मराठी, इंग्रजी इत्यादी विषयांचे शैक्षणिक व्हिडिओ तयार केले. आजही त्या चॅनल चा वापर मुलांना होतो चॅनेलवर दीडशे पेक्षा जास्त व्हिडिओ आहेत.
शिक्षक बंधू भगिनींना शैक्षणिक कामात मदत होण्यासाठी एज्युकेशनल ब्लॉग सुरू केला. दररोज येणारे नवनवीन परिपत्रके तसेच विविध माहिती या ब्लॉगवर अपडेट केली जाते. https://arjunshirsat.blogspot.com/
शैक्षणिक क्षेत्रात नवनवीन तंत्रज्ञानाचा उपयोग करून विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्न केले.
शाळेच्या प्रवाहात नसलेल्या मुलांना शाळेच्या प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न केले.
कोपरगाव नगरपालिका मुख्याधिकारी सुहास जगताप, नगरपालिका शिक्षण मंडळाचे प्रशासन अधिकारी श्रीराम थोरात, मुख्याध्यापक विलास माळी, निर्मला बनसोडे, शोभा गाडेकर, कल्पना निंबाळकर, मंगल बिबवे, शबनम खान,प्रतिभा केने, ज्योती पवार, माणिक कदम (शिक्षक बँक संचालक) सुनिल रहाणे, अरुण पगारे, प्रशांत शिंदे, कैलास साळगट, अमोल कडू, संतोष जाधव, सनी गायकर, गोपाळ कोळी व सर्व शिक्षक, पालक यांनी त्यांचे अभिनंदन व कौतुक केले आहे.
